Ads

Thursday, December 10, 2020

मुंबई इंडियन्सने पार्थिव पटेलला निवृत्तीनंतर दिली महत्वाची जबाबदारी, अंबानी यांनी नेमके काय सांगितले पाहा...

: भारताचा सदाबहार यष्टीरक्षक पार्थिव पटेलने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृती जाहीर केली. पण पार्थिवने निवृत्ती जाहीर केल्यावर फक्त एकाच दिवसात आयपीएलमधील सर्वात यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्सने महत्वाची जबाबदारी दिली आहे. यावेळी संघाचे मालक अंबानी यांनी पार्थिवबद्दल नेमके काय म्हटले आहे, पाहा... पार्थिव २०१५ ते २०१७ या कालावधीमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला होता. या कालावधीमध्ये पार्थिव नेमका कसा खेळाडू आहे, हे मुंबई इंडियन्सच्या संघाला समजले होते. त्यामुळे त्यांनी आता पार्थिववर एक महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार पार्थिव मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता टॅलेंट स्काऊटचे काम करणार आहे. त्याचबरोबर पार्थिवला आता मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. टॅलेंट स्काऊटचे काम नेमके असते तरी काय... आतापर्यंत आयपीएमध्ये आपण असे बरेच खेळाडू पाहिले की त्यांना यापूर्वी कोणीही ओळखत नव्हते. त्यांचा चेहरा किंवा त्यांची कामगिरी लक्षात आली नव्हती. पण हे खेळाडू स्थानिक पातळीवर दमदार कामगिरी करत होते. स्थानिक पातळीवर कोणते युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत आणि त्याचा आपल्या संघाला नेमका कसा फायदा होऊ शकतो, हे शोधण्याचे काम टॅलेंट स्काऊटचे असते. टॅलेंट स्काऊट युवा प्रतिभांना शोधून संघाच्या प्रशिक्षकांपुढे सादर करत असतो. त्यानंतर या युवा खेळाडूंना चाचपडले जाते आणि त्यानंतरच त्यांचा संघात समावेश केला जातो. भविष्यात जर एखाद्या संघाला राखीव फळी जर चांगली बनवायची असेल तर त्यासाठी टॅलेंट स्काऊटची भूमिका महत्वाची ठरत असते. पार्थिवबाबत अंबानी नेमके काय म्हणाले, पाहा...पार्थिव पटेल हा आमच्या संघासोबत जोडला गेला, हे पाहून मला आनंद झाला आहे. तो जेव्हा आमच्या संघातून क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याच्याकडे खेळ आणि खेळाडूंची चांगली माहिती आहे, हे आम्हाला समजले होत. या गोष्टीचाच फायदा संघासाठी होऊ शकतो. मला आशा आहे की, पार्थिव पटेलमुळे आमच्या संघाची राखील फळी भक्कम होईल आणि संघाकडून जास्त युवा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, असे मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक आकाश अंबानी यांनी सांगितले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gA3K8m

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...