दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा गुणतक्ता अपडेट केला आहे. या गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडियविरुद्ध झालेली कसोटी मालिका त्यांनी २-० अशी जिंकली. यामुळे त्यांनी १२० गुण मिळवले. गुणतक्त्यात भारत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. वाचा- काही दिवसांपूर्वी आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्याबाबत एक मोठा बदल होता. आयसीसीच्या नव्या नियमानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा निर्णय संघांना मिळणाऱ्या गुणांच्या टक्केवानुसार घेतला जाईल. या निर्णयाचा सर्वात पहिला फटका भारतीय संघाला पोहोचला. भारतीय संघ आधीच्या नियमानुसार पहिल्या स्थानावर होता. पण आता नव्या नियमानुसार तो दुसऱ्या स्थानावर तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर गेला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ८२.२ इतकी आहे तर भारताची ७५ टक्के इतकी आहे. करोना व्हायरसमुळे ज्या मालिका झाल्या नाहीत त्या ड्रॉ झाल्या असे समजण्यात आले. आयसीसीच्या या नियमाचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. तर नुकसान भारताचे झाले. वाचा- गुणांचा विचार केल्यास भारताचे ३६० गुण तर ऑस्ट्रेलियाचे २९६ गुण आहेत. तर न्यूझीलंडचे ३०० गुण आहेत. विजयाच्या टक्केवारीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ८२.२, भारताची ७५.० तर न्यूझीलंडची ६२.५ इतकी होते. आधीचा नियम काय होता? ICCने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची घोषणा केली होती तेव्हा असे सांगितले गेले होते की, एका कसोटी मालिकेत संघाला अधिकतर १२० गुण मिळवता येतील. एक संघ सहा मालिका खेळेल आणि त्यापैकी ३ मालिका घरच्या मैदानावर आणि ३ परदेशात होतील. एकूण एक संघ जास्तीत जास्त ७२० गुण मिळवू शकतील. दोन सामन्यांच्या मालिकेत एक विजयासह ६० गुण तर ३ सामन्यांच्या मालिकेत ४० गुण अशाच पद्धतीने ४ सामन्यांच्या मालिकेत एका विजयासाठी संघाला ३० गुण मिळतील. पाच सामन्यांची मालिका असेल तर २४ गुण. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना समान गुण मिळतील आणि जर कसोटी ड्रॉ झाली तर एकूण गुणाच्या एक तृतियांश दोन्ही संघांना मिळतील. याचा अर्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिकेत विजयासाठी ३० गुण, टायसाठी १५ तर ड्रॉ झाल्यावर १० गुण मिळतील. न्यूझीलंड बिघडवू शकते भारताचे गणित.... वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल दोन स्थानात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ भारतासाठी अडचणी निर्माण करू शकतात. न्यूझीलंडला आणखी एक कसोटी मालिका खेळायच्या आहेत आणि ती त्यांच्यात देशात पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही मालिका २ सामन्यांची आहे. याचा अर्थ न्यूझीलंडला १२० गुण मिळवण्याची संधी आहे. या उटल भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार आणि पुढील वर्षी इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेचा निकाल भारताच्या बाजूने लागला नाही तर विराट आणि कंपनीसाठी अडचणीचे ठरू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37gdn9l
No comments:
Post a Comment