Ads

Monday, December 14, 2020

India vs Australia first Test : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मिळाले बुस्टर

सिडनी: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात झालेला डे-नाइट सराव सामना ड्रा झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघाला या सराव सामन्याआधी आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताच्या संघ व्यवस्थापनापुढे देखील निवडीसाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. सराव सामन्यातील अखेरच्या दिवशी जेव्हा सामना थांबला तेव्हा ऑस्ट्रेलिया अ संगाने २५ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर बेन मॅकडर्मोट आणि जॅक विल्डरमुथ यांच्या शतकी खेळीमुळे त्यांनी चार बाद ३०५ धावा केल्या. या दोघांनी भारतीय जलद गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. वाचा- मॅकर्मोटने १०७ धावा तर कर्णधार एलेक्स कॅरीने ५८ धावा केल्या आणि चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची भागिदारी केली. या दोघांच्या भागिदारीमुळे सामना ड्रॉ झाला. तर विल्डरमुथने १११ धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री हा सामना पाहत होते. या सामन्याने विराट आणि शास्त्री यांना कसोटी सामन्यासाठी काही चांगले पर्याय दिले आहेत. मोहम्मद शमीने एका तासात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांना बाद केले. त्याने १३ षटकात ५८ धावा देत दोन विकेट घेतल्या. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही फलंदाजांनी धावा केल्या नाहीत ही त्याच्यासाठी काळजी करणारी बाब ठरू शकते. भारतीय संघाबाबत विचार करायचा झाला तर पृथ्वी शॉने दोन्ही डावात खराब फलंदाजी केली. पण शुभमन गिलने संयमी खेळी केली. हनुमा विहारी देखील अशाच पद्धतीने खेळला. त्याच्या शतकी खेळीमुळे कसोटी संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. तो गोलंदाजी देखील करू शकतो. त्याने कॅरीची विकेट घेतली होती. त्यामुळे संघात सहावा गोलंदाज म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत केएल राहुल सलामीला किंवा मधळ्या फळीत फलंदाजीला येऊ शकतो. त्याच्याकडे ३६ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. वाचा- डे-नाइट सराव सामन्यात पंतने ७३ चेंडूत शतक झळकावले आहे. त्यामुळे विकेटकिपर म्हणून तो मुख्य दावेदारी करू शकतो. फलंदाजीच्या जोरावर पंत सामना फिरवू शकतो. अशी क्षमता वृद्धीमान साहाकडे दिसत नाही. गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि आर अश्विन यांनी कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. उमेश आणि अश्विन दुसरा सराव सामने खेळले नाहीत. त्याच्या ऐवजी बुमराह आणि शमीला संघात घेतले गेले होते. तिसऱ्या दिवशी नवदीप सैनीने १६ ओव्हर आणि मोहम्मद सिराजने १७ ओव्हर टाकल्या. या दोघांकडे बॅकअप गोलंदाज म्हणून पाहिले जाते. कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मिळालेल्या पाच सकारात्मक बातम्या... >> कसोटी मालिकेआधी भारतीय संघाने खेळलेला सराव सामा ड्रॉ झाला. यातून काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. या सामन्यात ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी शतकी खेळी केली. ज्यामुळे भारतीय संघातील मधळी फळी मजबूत झाली आहे. >> युवा फलंदाज शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत चांगले संकेत दिले आहेत. पहिल्या सामन्यात त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. गिलने ४३ आणि ६५ धावा केल्या. >> मयांक अग्रवाल देखील परत फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने दुसऱ्या डावात ६१ धावा केल्या होत्या >> मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेद यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. >> चेतेश्ववर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली. पहिल्या सराव सामन्यात अजिंक्यने शतक झळकावले. तर दुसऱ्या डावात पुजाराने अर्धशतक केले. आता कसोटी सामन्यात अशाची कामगिरी त्यांनी करने अपेक्षित आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nhcJ0x

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...