Ads

Wednesday, December 9, 2020

farmers protest : शेतकऱ्यांच्या आंदोनलानात आयपीएलमधील खेळाडूही सहभागी, म्हणाला...

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता आयपीएमधील किंग्स इलेव्हन पंजाबच्या खेळाडूने आता पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर या आंदोलनात हा खेळाडू सहभागीही झाला होता. त्याचबरोबर माझे वडिल असते तर ते या आंदोलनात सहभागी नक्कीच झाले असते, असे वक्तव्यही त्याने केले आहे. या खेळाडूने आपेल काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यांना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघातील क्रिकेटपटू आणि पंजाबच्या रणजी संघाचा कर्णधार मनदीप सिंग यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी मनदीप म्हणाला की, " मी या आंदोलनात सहभागी झालो आहे. कारण माझे वडिल जर जीवंत असते तर ते नक्कीच या आंदोलनात उतरले असते. आज त्यांना आपल्या मुलाचा गर्व वाटत असेल. कारण माझ्यापरीने मी या आंदोलनासाठी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत." मनदीप आणि त्याचा भाऊ हरविंदर सिंग या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी मनदीप म्हणाला की, " सध्याच्या घडीला देशात जबरदस्त थंडी पडलेली आहे. पण या परिस्थितीतही हे शेतकरी बांधव रस्त्यावर राहून शांतपणे आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच मी या आंदोलनात उतरलो आहे." करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारने आता शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. त्याचबरोबर पनेसारने एक व्हिडीओ बनवला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅगही केलला होता. या व्हिडीओमध्ये पनेसारने लिहिले होते की, " आता तुम्हाला तुम्हीच घेतलेला निर्णय बदलण्याची वेळ आलेली आहे. देशातील शिख बांधव तुमच्याकडे त्यासाठी आले आहेत, जोपर्यंत तुम्ही हा निर्णय बदलत नाही तोपर्यंत ते तुमच्याकडे येतच राहतील."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mWCwLv

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...