सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यापूर्वी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यापूर्वी जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहली जेव्हा पेव्हेलियनमध्ये जात होता. तेव्हा एक महिला चाहती रागावून कोहलीवर ओरडल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल व्हायला लागला आहे. कोहली हा तिसऱ्या सामन्यापूर्वी पेव्हेलियनच्या दिशेने जात होता. तेव्हा एक महिला चाहती पेव्हेलियनच्या जवळच्या स्टँडमध्ये उपस्थित होती. कोहलीला पाहून ती चाहता रागने ओरडली आणि म्हणाली की, " भारतामध्ये शेतऱ्यांचे आंदोलन सुरु आहे आणि कोहली तु त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे." कोहील हा सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी सांगत असतो, त्याचबरोबर तो काही समाजिक प्रश्नही हाताळताना दिसतो. पण आतापर्यंत कोहलीने देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आपली प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूने याबाबत कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, हे पाहून ही महिला चाहती चांगलीच रागावलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांबाबत काही घोषणाही या महिला चाहतीने दिल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीला देशभरात शेतकऱ्यांचे आंदोन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ८ डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याचा चांगला प्रतिसादही मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर काही क्रिकेटपटूंनी यावेळी भारत बंदला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंतीही केली. यामध्ये भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगचाही समावेश होता. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पनेसारनेही यावेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंतीही केली होती. करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात 'बळाचा वापर' करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/340sIsy
No comments:
Post a Comment