सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशात परतणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विराट बाप होणार आहे. त्यासाठी तो भारतात परतणार आहे. विराट नसताना भारतीय संघाचे उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी कोण नेतृत्व करेल याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार यांच्या मते शानदार कर्णधार आहे आणि त्याचे नेतृत्वात आक्रमक शैली आहे. वाचा- पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना चॅपल म्हणाले, ऑस्ट्रेलिया विरुद्ध धर्मशाला मार्च २०१७ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात मी त्याला नेतृत्व करताना पाहिले आहे. मला त्याचे नेतृत्व शानदार वाटले. खर तर तो एक आक्रमक कर्णधार आहे. कसोटी मालिकेचे वेळापत्रक १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता) २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता) ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता) ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता) वाचा- तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर आक्रमकपणे खेळत होता. कुलदीप यादव त्याची पहिली कसोटी खेळत होता आणि त्याने वॉर्नरची विकेट घेतली. भारत तेव्हा छोट्या धावांचा पाठलाग करत होता आणि त्यांनी दोन विकेट गमावल्या होत्या. पण रहाणे मैदानावर ठामपणे आक्रमकपणे फलंदाजी करत राहिला. त्याने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. मला त्याचा आक्रमकपणा आवडला असे चॅपल म्हणाले. कर्णधार म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय असतात एक आक्रमक दुसरा बचावात्मक. माझ्या मते कसोटी क्रिकेटसाठी आक्रमक नेतृत्व गरजेचे आहे आणि राहणे आक्रमक आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m1P4jh
No comments:
Post a Comment