
नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमधील सध्याचा आघाडीचा फलंदाज असलेल्या विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही. जगभरातील क्रिकेट चाहते आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये विराट प्रसिद्ध आहे. विराटची फलंदाजी ही लोकांना टिव्ही समोर बसवते. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांची संख्या जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या विराटने आतापर्यंत वनडेत ४३ तर कसोटीत २७ अशी ७० शतक केली आहेत. वाचा- भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या विराट सारखा फलंदाज होण्याचे स्वप्न अनेकांचे आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याचा मुलगा विराटचा मोठा चाहता आहे. भारताचा सामना असताना तो नेहमी विराट फलंदाजीला आला की मला उठवा असे सांगतो. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत बाद झाल्यानंतर तो दुसऱ्या खोलीत गेला. लहान मुलांमध्ये विराट खुप लोकप्रिय आहे. तो एक स्पेशल खेळाडू आहे, असे वॉन म्हणाला. दुसऱ्या वनडेत विराटने ८९ धावा केल्या. या सामन्यात भारत ३९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होते. विराट शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण शॉट मिडविकेटवर एक शानदार कॅचवर तो बाद झाला. या वर्षी विराटने ८ वनडे सामन्यात ४ अर्धशतक झळकावली आहेत. त्याला अद्याप एकही शतक करता आले नाही. वाचा- विराटला शतक करता आले नाही म्हणून भारतीय चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एक शतक झळकावल्यानंतर तो ३-४ शतक सहज करेल, असे वॉनने सांगितले. वाचा- याबाबत काळजी... विराटची फलंदाजी हा काळजीचा विषय नाही. मला काळजी वाटते ती त्या ३ कसोटी सामन्यांची ज्यात विराट कोहली खेळणार नाही. विराट कोहली शिवाय भारतीय संघाला विजय मिळवता येईल असे वाटत नाही. कसोटी संघात तो गरजेचा आहे, असे वॉन म्हणाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3lsNIhc
No comments:
Post a Comment