नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मालिकेत भारताचा १२ धावांनी पराभव झाला असला तरी मालिका २-१ जिंकून भारताने वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेतला. टी-२० मालिकेत भारताच्या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर हार्दिकने जे काही केले त्यामुळे सर्वांची मने जिंकली. वाचा- वनडे पाठोपाठ हार्दिक पंड्याने टी-२० मालिकेत शानदार फलंदाजी केली. यामुळेच त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पण हार्दिकच्या मते सामनावीर पुरस्काराचा खरा जलद गोलंदाज याला दिला पाहिजे. हार्दिकने त्याला मिळालेली सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी नटराजनला दिली. इतक नव्हे तर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून नटराजनचे कौतुक केले. वाचा- नटराजन, तु या मालिकेत शानदार कामगिरी केली. कठीण परिस्थितीत पदार्पण करत शानदार कामगिरी करून स्वत:ला सिद्ध करून दाखवलेस. तुझ्या या यशा मागे मोठी मेहनत आहे. माझ्याकडून ही ट्रॉफी तुला, अभिनंदन! हार्दिकच्या या ट्विटवर सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली. सर्व जण हार्दिकचे कौतुक करत आहेत. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून प्रथम वनडेत आणि नंतर टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने ६ विकेट घेतल्या. मालिकेत सर्वाधिक विकेट त्यानेच घेतल्या. हार्दिकने ३ सामन्यात १५६च्या स्ट्राइक रेटने ७८ धावा केल्या. दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. वाचा- तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १८६ धावा केल्या. भारताला विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी १२ धावा कमी पडल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37RkuE0
No comments:
Post a Comment