नवी दिल्ली : प्रेक्षक जिथे सांगतील तिथे षटकार ठोकणारे भारताचे माजी लोकप्रिय फलंदाज यांचे आज निधन झाल्याचे वृत्त एका पत्रकाराने दिले होते. पण दुरानी यांचे खरंच निधन झाले आहे की ही अफवा आहे, पाहा फॅक्ट चेक... दुरानी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला होता. भारताच्या अनेक विजयांमध्ये दुरानी यांचा मोलाचा वाटा होता. भारताने जेव्हा १९६०-६१ साली इंग्लंडला भारतामध्ये पराभूत केले होते, त्यामध्ये दुरानी यांचा सिंहाचा वाटा होता. इंग्लंडविरुद्धच्या कोलकाता येथील सामन्यात दुरानी यांनी आठ विकेट्स मिळवले होते, तर चेन्नई येथील सामन्यात त्यांनी १० बळी मिळवण्याची किमया साधली होती. त्याचबरोबर वेस्ट इंडिजमध्ये भारताने जेव्हा पोर्ट ऑफ स्पेन येथे पहिला विजय मिळवला होता तेव्हा दुरानी यांनी क्लाइव्ह लॉइड आणि सर गॅरी सोबर्स यांच्या महत्वाच्या विकेट्स भारताला मिळवून दिल्या होत्या. दुरानी यांचे निधन झाल्याचे वृत्त अमृत माथूर यांनी दिले होते. पण त्यांना आपली चुक समजली आणि त्यांनी जाहीररीत्या ट्विटरवर माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये माथून यांनी म्हटले आहे की, " मी माहितीमध्ये बदल करत आहे, कारण सलीम दुरानी यांची प्रकृती अजूनही चांगली आहे. मी त्यांच्याचबाबत जी माहिती दिली होती त्याबद्दल मी जाहीर माफी मात आहे. सलीम दुरानी यांना दिर्घायुष्य लाभो आणि आयुष्यातही ते आपले शतक पूर्ण करोत." दुरानी यांच्या निधनाच्या बातमीनंतर एकच खळबळ उडाली होती. कारण सलीम हे चाहत्यांचे सर्वात आवडते फलंदाज होते. कारण .प्रेक्षक मैदानात जिथे षटकार मारायला सांगतील तिथे ते सिक्सर मारायचे, यासाठी चाहत्यांचे ते लाडके होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. पण सलीम यांची तब्येत अजून चांगली असल्याचे कळताच त्यांना सुखद धक्का बसला आणि त्यांनी दुरानी यांना दिर्घायुष्य मिळो, अशी भावना व्यक्त केली आहे. दुरानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ या दिवशी अफगाणिस्तान येथील काबुल येथे झाला होता. समील हे सध्या ८५ वर्षांचे आहेत. कानपूर येथे १९७३ साली जेव्हा सलीम यांना कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते, तेव्हा चाहत्यांनी ' नो दुरानी, नो टेस्ट' असे फलकही झळकावले होते. दुरानी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारही दुरानी यांना मिळालेला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3n2fmDk
No comments:
Post a Comment