Ads

Monday, December 14, 2020

विराट निर्दयी होतो, त्याच्याशी पंगा घेऊ नका; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना कर्णधाराचा सल्ला

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यावर सर्वांची नजर असेल. एडिलेड येथे होणाऱ्या पहिल्या डे-नाइट सामन्यानंतर भारताचा कर्णधार मायदेशात परतणार आहे. विराट कोहली जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाप होणार आहे. वाचा- भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका यजमानांनी जिंकली होती. तर टी-२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता कसोटी मालिका दौऱ्याचे पारडे कोणाकडे होते हे ठरवेल. कसोटी मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार एरॉन फिंच याने संघाला सावध केले आहे. वाचा- फिंचने ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला दिला आहे की, भारतीय कर्णधाराशी पंगा घेऊ नका. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राशी बोलताना फिंच म्हणाला, मला वाटते की विराट कोहलीमध्ये बदल झाला आहे. एक खेळाडू म्हणून तो पूर्वीच्या तुलनेत मैदानावर नॉर्मल असतो आणि तो खेळाची गती समजून घेतोय. भारतीय संघाचा सलग दोन वनडेत पराभव झाल्यानंतर सलग तीन विजयांची नोंद केली होती. वनडेतील २-१ चा पराभव भारताने टी-२० मालिकेत घेतला. वाचा- कसोटी मालिका सुरू झाल्यावर मैदानावरील वातावरण गरम होऊ शकते. तेव्हा दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना काही बोलू शकतील. अशा वेळी मला वाटते की, खेळाडूंनी संतुलन ठेवावे. तुम्ही असा विचार करू नका की विराट तुमच्या समोर वाद घालण्यासाठी उभा राहिल. कारण तो जेव्हा असे काही करतो तेव्हा विरोधी संघाबाबत अधिक निर्दयी होतो, असे फिंच म्हणाला. वाचा- कसोटी मालिकेतील पहिली लढत डे-नाइट असणार आहे. भारतीय संघाची ही दुसरी डे-नाइट लढत आहे. याआधी भारताने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे डे-नाइट कसोटी खेळली होती. कसोटी मालिकेचे वेळापत्रक १) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट २) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न ३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी ४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा ( पहिली डे नाइट कसोटी भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता. सुरु होईल. तर अन्य तीन सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत) भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3a9GDjV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...