
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात काही बदलासह उतरण्याची शक्यता आहे. भारताने मालिकेतील पहिल्या दोन लढती गमावल्या असल्याने ही लढत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी असेल. बुधवारी दोन डिसेंबर रोजी कॅनबरा येथे होणाऱ्या लढतीत भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहेत. वाचा- मालिकेतील पहिल्या दोन लढतीत भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली होती. त्यामुळे या अखेरच्या लढतीत विराट कोहली गोलंदाजीत काही बदल करू शकतो. हा बदल गोलंदाजी मजबूत करण्यासाठी केला जाऊ शकतो. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ३७४ तर दुसऱ्या वनडेत ३८९ धावा केल्या होत्या. आता अखेरच्या लढतीत विराट कोहली फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. वाचा- भारतासाठी तिसरी आणि अखेरची लढत ही प्रतिष्ठेची आहे. असा असू शकतो भारताचा संघ... धवन-मयांक सलामीवीर भारतीय डावाची सुरूवात पुन्हा एकदा अनुभवी शिखर धवन आणि मयांक अग्रवाल हेच करतील. पहिल्या दोन्ही लढतीत अर्धशतकी भागिदारी करणाऱ्या या जोडीकडून यावेळी मोठी भागिदारी होण्याची अपेक्षा आहे. वाचा- अशी असेल मधली फळी मधल्या फळीत पुन्हा एकदा विराट कोहलीकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. श्रेयस अय्यर पहिल्या दोन लढतीत अपयशी ठरला होता. केएल राहुल चांगल्या लयमध्ये दिसत आहे. पण दोन्ही सामन्यात विजय मिळून देण्यात अपयशी ठरला होता. या तीनपैकी एका फलंदाजाला सामना अखेरपर्यंत घेऊन जावा लागेल. अष्ठपैलू जडेजा आणि हार्दिक हार्दिक पांड्याने गेल्या सामन्यात गोलंदाजी केली होती. अखेरच्या लढतीत देखील तो गोलंदाजी करू शकतो. रविंद्र जडेजा देखील गोलदाजी आणि फलंदाजीत योगदान देऊ शकतो. वाचा- फिरकीपटूचा हा पर्याय कुलदीप यादवला तिसऱ्या वनडेत संधी मिळू शकते. युजवेंद्र चहल सोबत तो चांगली कामगिरी करू शकतो. बुमराह आणि शमी पहिल्या दोन लढतीत नवदीप सैनीला अखेरच्या लढतीत वगळले जाऊ शकते. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हेच जलद गोलंदाजाची मुख्य बाजू सांभाळतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2VooZjL
No comments:
Post a Comment