मुंबई: करोना व्हायरसमुळे जवळजवळ एका वर्षापासून भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झाले नाहीत. भारतीय खेळाडूंनी आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळली. त्यानंतर ते थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका झाली होती. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने जिकंली होती. त्यानंतर भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. वाचा- न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मलिका करोनामुळे रद्द झाली. भारतात १९ जानेवारी २०२० रोजी अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच झाली होती. त्यानंतर आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली आणि अन्य दौरे स्थगित करण्यात आले. आता भारतात वर्षभराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होत आहे. वाचा- इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याची सुरुवात पाच फेब्रुवारीपासून होत आहे. इंग्लंड दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. यातील तिसरा कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार पटेल मोटेरा स्टेडियमवर होणार असून हे मैदान जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. मालिकेतील तिसरा आणि चौथा कसोटी सामना याच मैदानावर होणार आहे. वाचा- या शिवाय मोटेरा स्टेडियमवर दोन्ही संघातील पाच टी-२० सामने होणार आहेत. या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. सध्या प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता मेलबर्न मैदान हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे. मेलबर्न मैदानावर एक लाख प्रेक्षक सामना पाहू शकतात. बीसीसीआयने करोना व्हायरसमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सर्व १२ सामने फक्त ३ मैदानावर आयोजित केले आहेत. हे सामने चेन्नई, अहमदाबाद आणि पुण्या होणार आहेत. वाचा- इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वेळपत्रक कसोटी मालिका पहिली कसोटी, चेन्नई- ५ ते ९ फेब्रुवारी दुसरी कसोटी, चेन्नई- १३ ते १७ फेब्रुवारी तिसरी कसोटी, अहमदाबाद- २४ ते २८ फेब्रुवारी (डे-नाईट) चौथी कसोटी, अहमदाबाद- ४ ते ८ मार्च --- टी-२० मालिका पहिली मॅच- १२ मार्च दुसरी मॅच- १४ मार्च तिसरी मॅच- १६ मार्च चौथी मॅच- १८ मार्च पाचवी मॅच- २० मार्च --- वनडे सामने पहिली वनडे- २३ मार्च दुसरी वनडे- २६ मार्च तिसरी वनडे- २८ मार्च
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37VopQc
No comments:
Post a Comment