नवी दिल्ली, : रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण रोहितसमोरच्या अडचणी आता संपलेल्या नाहीत. कारण आता रोहितला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. रोहितचे आता शेड्युल नेमकं काय असेल आणि त्याला काय करावं लागणार आहे, पाहा... रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली असून तो या आठवड्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. रोहितला बंगळुरुहून मुंबईला येणार आहे आणि त्यानंतर तो मुंबईहून दुबईला पोहोचणार आहे. त्यानंतर रोहितला दुबईवरुन सिडनीचे विमान पकडावे लागणार आहे. रोहित १३ डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर रोहितची ऑस्ट्रेलियामध्ये करोना चाचणी होऊ शकते. रोहित करोना चाचणीमध्ये निगेटीव्ह आल्यावर त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. रोहितच्या क्वारंटाइनचा काळ कमी करावा, अशी मागणी यावेळी बीसीसीआय ऑस्ट्रेलियाच्या सरकारला करू शकते. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने जर बीसीसीआयची मागणी मान्य केली तर रोहित लवकर भारतीय संघात दाखल होऊ शकतो. पण ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयची मागणी मान्य केली नाही, तर काय होऊ शकते पाहा.... ऑस्ट्रेलियाने जर बीसीसीआयची मागणी मान्य केली नाही तर रोहितला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. त्यामुळे रोहितला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. कारण रोहितचा क्वारंटाइनचा कालावधी हा ख्रिसमसनंतर संपणार आहे. त्यामुळे रोहित हा ७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो. पण जर ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयची मागणी मान्य केली तर रोहित दुसऱ्या सामन्यातही खेळताना आपण पाहू शकतो. त्यामुळे आता बीसीसीआय ऑस्ट्रेलियाला याबाबत विनंती करणार का आणि त्याचे पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. भारताचा पहिला कसोटी सामना हा अॅडलेड येथे १७ ते २१ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. हा सामना दिवस-रात्र असेल. यानंतर दुसरा कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये मेलबर्न येथे होणार आहे. या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना १५ जानेवारीला ब्रिस्बेन येथे सुरु होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m9f9gH
No comments:
Post a Comment