सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दुसरा होत आहे. सिडनी मैदानावर सुरू असेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या सराव सामन्याप्रमाणेच या देखील सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराश कामगिरी केली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली खरी. पण मयांक दोन धावा करून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पृथ्वी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. पृथ्वीने कसोटीत टी-२० स्टाइलने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि सलग ३ चौकार मारल्यानंतर तो बोल्ड झाला. त्यानंतर हनुमा विराही १५, गिल ४३, कर्णधार रहाणे चार, ऋषभ पंत ५, वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाले. साहा बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ७ बाद १११ अशी होती. त्यानंतर सैनी चारवर , मोहम्मद शामी शून्यार बाद झाले. अखेरच्या जोडीसाठी आणि मोहम्मद सिराज यांनी ७१ धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. बुमराह ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ही खेळी केली. सिराज २२ धावांवर बाद झाला. भारताकडे चांगल्या फलंदाजांची फळी असताना देखील त्यांना कोणाला अर्धशतक देखील करता आले नाही. बुमराहने म्हणजे १०व्या क्रमांकाच्या फलंदाजाने सर्वाधिक नाबाद ५५ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oIpB09
No comments:
Post a Comment