नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडचा संघ वनडे मालिका न खेळताच माघारी परतला आहे. दोन्ही देशातील टी-२० मालिका झाल्यानंतर वनडे मालिका होणार होती. पण करोनामुळे पहिली वनडे प्रथम स्थगित करण्यात आली आणि नंतर संपूर्ण मालिकाच रद्द केली गेली. करोना व्हायरस रोखण्याबाबत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला आलेल्या अपयशामुळे एका देशाने दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला. वाचा- इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा कधी हॉटेलमधील कर्मचारी तर कधी खेळाडूंना करोना झाल्यामुळे चर्चेत आला. टी-२० मालिका झाल्यानंतर पहिला वनडे सामना स्थगित करण्यात आला. नव्याने निश्चित केलेल्या दिवशी देखील सामना न झाल्याने अखेर तो रद्द करावा लागला. कारण दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर इंग्लंड संघातील दोघा खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पूर्ण मालिकाच रद्द करण्याचा निर्णय दोन्ही क्रिकेट बोर्डांनी घेतला. या संपूर्ण घटनेमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाची झोप उडाली आहे. वाचा- करोनाचा धोका असताना अनेक देशात क्रिकेट मालिका होत असताना आता आफ्रिकेतील घटनांमुळे श्रीलंका बोर्ड दौरा रद्द करण्याचा विचार करत आहे. आफ्रिकेतील बायोबबल व्यवस्थेची लंकेच्या बोर्डाला काळजी वाटते. त्यामुळेच ते दौरा रद्द करण्याचा विचार करत आहेत. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पण इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका रद्द झाल्याने लंका बोर्ड ही मालिका रद्द करण्याचा विचार करत आहे. कदाचित श्रीलंकेचा संघ आफ्रिकेला जाण्याऐवजी आफ्रिकेच्या संघाला लंकेत येण्याचे आमंत्रण देऊ शकतील. वाचा- दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेआधी करोना व्हायरसने डोक वर काढले होते. पण नंतर करोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने टी-२० मालिका झाली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Lpl3gT
No comments:
Post a Comment