नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सोशल मीडियावर फार कमी वेळा असतो. पण या वर्षात सर्वात गाजलेले ट्विट हे धोनीचेच ठरले आहे. धोनीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक उत्तर दिले होते. हे उत्तर चाहत्यांना कमालीचे आवडले होते. त्यानंतर बऱ्याच चाहत्यांनी हे रीट्विट केले होते. त्यामुळे २०२० या वर्षातील सर्वात गाजलेले ट्विट हे धोनीचे ठरलेले आहे. धोनीने मोदी यांना नेमके काय उत्तर दिले होते...धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी धोनीचे आभान मानले होते. मोदी यांनी धोनीला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये धोनीने देशासाठी नेमके काय केले आणि त्याने देशासाठी कशी सेवा केली, याचा उल्लेख करण्यात आला होता. मोदी यांनी हे पत्र धोनीला पाठवले होते. धोनीने मोदी यांच्या पत्रावर आपली प्रतिक्रीया दिली होती. धोनीने याबाबत ट्विट केले होते. धोनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, " एखादा सीमेवरील जवान, कलाकार आणि क्रीडापटू हे बरीच मेहनत घेत असतात आणि आपल्या देशासाठी बऱ्याच गोष्टींचा त्यागही करतात. त्यामुळे जेव्हा त्यांच्या कामाची दखल घेतली जाते, तेव्हा निश्चितच त्यांना ते आवडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण माझ्या कामाची दखल घेतली, याबद्दल मी आपला आभारी आहे." धोनीने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता. त्यांतर धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात दिसू शकतो, असे म्हटले जात होते. पण धोनीने आयपीएल सुरु होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याटनंतर धोनी आयपीएल खेळायला युएईमध्ये गेला होता. पण यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघाची वाईट कामगिरी झाली होती. या स्पर्धेतून पहिला बाहेर पडणारा संघ हा चेन्नईचा ठरला होता. त्यामुळे आता पुढच्या वर्षी धोनी खेळणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Kou9tA
No comments:
Post a Comment