सिडनी, : ऑस्ट्रेलियाला तिसरा सामना जिंकता आला नाही, भारतीय संघाने हा सामना वाचवण्यात यश मिळवले. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपले मत व्यक्त केले आहे. अजिंक्य या सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला, पाहा.... सामना संपल्यावर अजिंक्य म्हणाला की, " भारतीय संघाने यावेळी आपले कॅरेक्टर दाखवून दिले. कारण शेवटपर्यंत लढत राहायचं, हे आम्ही ठरवलं होतं. त्यावेळी कोणत्याही निर्णयाचा विचार करायचा नाही, हेदेखील स्पष्ट केले होते. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी यावेळी जी कामगिरी केली ती नक्कीच अतुलनीय आहे. कारण भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाज करत हा सामना वाचवला. पण अजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे." रिषभ पंत आणि जडेजाबद्दल अजिंक्य काय म्हणाला, पाहा... या सामन्यात रिषभ पंतला फलंदाजीमध्ये बढती देण्यात आली, त्याचबरोबर रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत झाली आहे. या गोष्टींबाबत अजिंक्य म्हणाला की, " पुजारा खेळपट्टीवर असताना उजव्या आणि डाव्या फलंदाजांना असायला हवे, असे आम्हाला वाटले होते. त्यामुळे पंतला फलंदाजीमध्ये बढती देण्यात आली. पंतने यावेळी त्याच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्याचबरोबर जडेजाला दुखापत झाली आहे. त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, हे समजले असून आता फिजिओ त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे चौथ्या सामन्याच्या विचार करताना या काही गोष्टींचा विचार आम्हाला करावा लागणार आहे." अजिंक्य पुढे म्हणाला की, " मी खासकरून आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांचे नाव घेईन. कारण या दोघांनी ज्यापद्धतीने फलंदाजी केली ती नेत्रदीपक अशीच होती. या दोघांनी ज्यापद्धतीने तिसऱ्या सत्रामध्ये जी फलंदाजी केली ती भारतीय संघासाठी महत्वाची ठरली. भारतीय संघातील खेळाडू काय करू शकतात, हे यामधून सर्वांनाच पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यातून बऱ्याच सकारात्मक गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत, या गोष्टींचा फायदा नक्कीच चौथ्या कसोटी सामन्यात होणार आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39n1cHo
No comments:
Post a Comment