सिडनी, : भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना वाचवला. त्यामुळेत आता भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण १५ जानेवारीपासून चौथ्या कसोटी समन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघापुढे मोठी आव्हाने असतील, असे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाला सर्वात जास्त चिंता असेल ती दुखापतींची. कारण भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत झाली असून तो चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची उणीव नक्कीच भारतीय संघाला भासणार आहे. पण त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे, हा महत्वाचा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागणार आहे. साधारणत: एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि तो पुढचा सामना खेळणार नसेल तर बदली खेळाडू मायदेशातून पाठवला जातो. पण करोनामुळे त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. त्यामुळे भारताला आता अतिरीक्त खेळाडू मिळणार नाही. या सामन्यात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांनाही दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण या दोघांनीही दुखापतीनंतर फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. पण या फलंदाजीनंतर त्यांची दुखापत अजून बळावली आहे की नाही, ही गोष्टदेखील भारतीय संघाला पाहावी लागणार आहे. कारण त्यांची दुखापत जर बळावली गेली असेल तर त्यांना चौथ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही आणि भारतीय संघाची चिंता अजून वाढू शकते. चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोणत्या खेळाडूला संधी द्यायची, याचा विचार भारतीय संघाला करावा लागणार आहे. जडेजाच्या जागी एका गोलंदाजाला संधी द्यायची की अतिरीक्त फलंदाज खेळवायचा, हा भारतीय संघापुढे मोठा प्रश्न असेल. जडेजाच्या जागी बरेच पर्याय भारतीय संघापुढे खुले असतील. जडेजाच्या जागी संघात कुलदीप यादव, वृद्धिमान साहा, मयांक अगरवाल, शार्दुल ठाकूर किंवा पृथ्वी शॉ यांचा पर्याय भारतीय संघापुढे असेल. पण यामधून नेमक्या कोणत्या खेळाडूला संधी द्यायची आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात नेमके कोणते बदल करायचे, हे भारतीय संघापुढे मोठे आव्हान असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qaeMVu
No comments:
Post a Comment