सिडनी, : चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा अर्धा संघ दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ नेमका कसा असेल, याबाबत बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण दुखापतींनंतर चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा असू शकतो, पाहा... शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर सध्याच्या घडीला फिट आहेत आणि ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे रोहित आणि गिल यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. त्याचबरोबर भारतीय संघाला अजून एका फलंदाजाची उणीव भासत असेल तर मयांक अगरवाल नसल्यामुळे संघात पृथ्वी शॉ याला संधी मिळू शकते. पृथ्वीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याला भारतीय संघ अखेरची संधी देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे पृथ्वीला तिसऱ्या स्थानावर संधी मिळू शकते. चौथ्या स्थानावर चेतेश्वर पुजारा आणि पाचव्या स्थानावर कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीला येतील. आतापर्यंत रिषभ पंतच्या दुखापतीचे स्वरुप समजलेले नाही, पण तो चौथा कसोटी सामना खेळेल असे म्हटले जात आहे. पण चौथा कसोटी सामना खेळताना तो यष्टीरक्षक करणार नसल्याचे समजते आहे. त्यामुळे संघात यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाचा समावेश करण्यात येऊ शकतो. भारतीय संघ या सामन्यात चार गोलंदाजांने उतरू शकतो. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. त्याचबरोबर जसप्रीत बुमरा जर खेळू शकणार नसेल तर त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी हे दोघेही फिट असल्यामुळे ते या सामन्यात कायम राहतील, असे समजते आहे. भारतीय संघाला या सामन्यात किती गोलंदाजांबरोबर उतरायचे आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण जर भारतीय संघाला पाच गोलंदाजांनिशी या सामन्यात उतरायचे असेल तर टी. नटराजनला संघात समावेश होऊ शकतो. पण नटराजनचा संघात समावेश झाला तर पृथ्वी शॉ याला खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडताना भारतीय संघाची चांगली कसोटी लागणार आहे. भारताच्या दुखापतग्रस्त पाच खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजासह हनुमा विहारी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, आर. अश्विन आणि मयांक अगरवाल यांचा समावेश असल्याचे आता पुढे आले आहे. त्यामुळे हे पाच खेळाडू चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39hFjJq
No comments:
Post a Comment