![](https://maharashtratimes.com/photo/80343201/photo-80343201.jpg)
ब्रिस्बेन, : चौथ्या कसोटी सामन्यात बरेच रंजक किस्से पाहायला मिळाले. यामध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत सामना सुरु असताना मैदानात गाणं गात असल्याचे पाहायला मिळाला. चाहत्यांना पंतचं हे गाणं चांगलंच आवडलं. पंतचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. पण सामन्याच्या पाचव्या दिवशी पंतची झुंजार फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याने चाहत्यांची मने जिंकली. चौथ्या दिवशी जेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि कॅमेरुन ग्रीन हे जेव्हा फलंदाजी करत होते. तेव्हा यष्ट्यांमागे पंत गाणं गात होता. रिषभ पंतचे हे गाणं स्टम्पमधील कॅमेरामध्ये कैद झाले आहे. पंत यावेळी सुपरमॅन... सुपरमॅन या गाण्याच्या ओळी गात असल्याचे पाहायला मिळाले. पंतचे हे गाणं ऐकून चाहत्यांचे यावेळी चांगलेच मनोरंजन झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्याच्या पाचव्या दिवशी पंतने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पंत आणि पुजारा यांनी यावेळी चांगली भागीदारी रचून भारतीय संघाला विजयासमीप आणून ठेवले होते. पण पुजारा बाद झाल्यावरही पंतने आपली दमदार फलंदाजी सुरुच ठेवली आणि भारताच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आग ओकत होते. खासकरून पुजारा हा त्यांच्या टार्गेटवर होता. कारण पुजारा बाद झाल्याशिवाय भारताची फलंदाजी खिळखिळी करू शकत नाही, हे त्यांना चांगलेच माहिती होती. पण पुजारा मैदानात चांगला बचाव करत होता. त्यामुळे पुजारा जर चांगल्या चेंडूवर आऊट होत नसेल तर त्याला बाद करण्यासाठी बाऊन्सर्स टाकत टाकत त्याचे लक्ष विचलित करण्याचे काम ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज करत होते. पुजारा आणि युवा सलामीवर शुभमन गिल यांनी यावेळी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. पुजारा आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. पुजारा आणि गिल यांनी दमदार फलंदाजी करत भारताला पहिल्या सत्रावर वर्चस्व मिळवून दिले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38WIN5q
No comments:
Post a Comment