![](https://maharashtratimes.com/photo/80342412/photo-80342412.jpg)
ब्रिस्बेन, : पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ रडीचा डाव खेळत असला तरी भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा चांगलाच लढला. पुजाराच्या अंगावर चेंडू टाकून त्याला घाबरवण्याचे काम यावेळी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज करत होते. पण पुजारा या सर्व गोष्टींना घाबरला नाही आणि आपले अर्धशतक साकारत त्याने कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची तोंडं बंद केली. एकदा तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टाकलेला बाऊन्सर पुजाराच्या डोक्यावर आदळला, पण तरीही पुजाराने यावेळी मैदान सोडले नाही. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आग ओकत होते. खासकरून पुजारा हा त्यांच्या टार्गेटवर होता. कारण पुजारा बाद झाल्याशिवाय भारताची फलंदाजी खिळखिळी करू शकत नाही, हे त्यांना चांगलेच माहिती होती. पण पुजारा मैदानात चांगला बचाव करत होता. त्यामुळे पुजारा जर चांगल्या चेंडूवर आऊट होत नसेल तर त्याला बाद करण्यासाठी बाऊन्सर्स टाकत टाकत त्याचे लक्ष विचलित करण्याचे काम ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज करत होते. पुजारा आणि युवा सलामीवर शुभमन गिल यांनी यावेळी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. पुजारा आणि गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. पुजारा आणि गिल यांनी दमदार फलंदाजी करत भारताला पहिल्या सत्रावर वर्चस्व मिळवून दिले. गिलने केला असा हा विक्रम..शुभमनच्या विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने शॉर्ट पिच चेंडू टाकले. पण गिलने त्यावर आक्रमक शॉट खेळले. ९१ धावांच्या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. या खेळीत गिलच्या नावावर एक नवा विक्रम जमा आला आहे. भारताकडून चौथ्या डावात सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम गिलच्या नावावर जमा झाला आहे. त्याच बरोबर सर्वात कमी वयात ९० हून अधिक धावा गिलने केल्या आहेत. याबाबत त्याने दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांना टाकले. गिलने २१ वर्ष १३३ दिवशी कसोटीतील चौथ्या डावात अर्धशतक केले. हा विक्रम आतापर्यंत सुनिल गावस्कर यांच्या नावावर होता. त्यांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या डावात नाबाद ६७ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bQpb4L
No comments:
Post a Comment