
सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून सुरु होणार आहे. पण या मालिकेतील चौथा सामना रद्द होऊ शकतो, असे चित्र सध्या दिसत आहे. पण चौथा रद्द करण्यापेक्षा अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत का, याची चाचपणी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत आहे. तिसरा कसोटी सामना उद्यापासून सिडनी येथे सुरु होणार आहे, तर चौथा कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे होणार आहे. पण आता चौथा सामना रद्द करण्याची वेळ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळावर येऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण तिसऱ्या कसोटी सामन्यावर आता अनिश्चिततेचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. सिडनीनंतर ब्रिस्बेनमध्ये जेव्हा भारतीय संघ पोहोचेल तेव्हा त्यांना क्वारंटाइन व्हावे लागेल, असे तेथील स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. यावर बरेच वाद विवाद झाले होते आणि आमचा संघ क्वारंटाइन होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने यापूर्वी घेतली होती. पण आता बीसीसीआयने या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला अल्टीमेटम देणार असल्याचे समजते आहे. येत्या काही दिवसांत जर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर ही मालिका तीन कसोटी सामन्यांची होऊ शकते. कारण जर बीसीसीआयला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाचे म्हणणे पटले नाही तर चौथा कसोटी सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. जर चौथा सामना ब्रिस्बेनमध्येच खेळवायचा असेल तर त्यांना नियम शिथिल करावे लागतील, कारण भारतीय संघ पुन्हा एकदा क्वारंटाइन होणार नाही. पण जर नियम शिथिल केले गेले नाहीत तर दोन पर्याय अजूनही खुले आहेत. चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेनमधून रद्द करून तो सिडनी येथे खेळवण्यात येऊ शकतो. हा सर्वात योग्य पर्याय असल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे. पण जर हा पर्याय बीसीसीआयला मान्य नसेल तर चौथा सामना रद्द करावा लागेल आणि ही कसोटी मालिका तीन सामन्यांची असेल. त्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयपुढे कोणता पर्याय ठेवते आणि त्यावर बीसीसीआय काय निर्णय घेते, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3biXJw7
No comments:
Post a Comment