![](https://maharashtratimes.com/photo/80327538/photo-80327538.jpg)
बेंगळुरू: भारतीय संघातील माजी फिरकीपटू (BC Chandrasekhar ) यांना बेंगळुरू मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रशेखर यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली. वाचा- चंद्रशेखर यांना अचानक अशक्तपणा जाणवू लागला त्यानंतर १५ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७५ वर्षीय चंद्रशेखर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना दोन दिवसात घरी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. बीएस चंद्रशेखर यांना बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते विनय मृत्यूंजय यांनी सांगितले. चंद्रशेखर यांची प्रकृती आता ठिक आहे. सामना पाहत असताना त्यांना बोलण्यास त्रास होत होता. त्यानंतर अशक्तपणा वाटू लागला, असे पत्नी संध्या यांनी एएनआयला सांगितले. वाचा- ..
वाचा- भारतीय संघाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या चंद्रशेखर यांनी ५८ कसोटी सामन्यात २९.७४च्या सरासरीने २४२ विकेट घेतल्या. त्यांनी १५ वर्षाच्या करिअरमध्ये १६ वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या होत्या. लेग स्पिनर असलेल्या चंद्रशेखर यांनी जानेवारी १९६१ साली पदार्पण केले आणि १९७९ साली अखेरची कसोटी खेळली. चंद्रशेखर यांनी न्यूझीलंडविरुद्ध एक वनडे सामना खेळला होता. त्यांनी ३६ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nSmmCn
No comments:
Post a Comment