Ads

Tuesday, January 12, 2021

तेव्हा विराटनेच मिळवून दिली होती इज्जत; स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला पडला विसर

नवी दिल्ली: AUS vs IND बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी वर्णद्वेशाविरुद्धच्या अभियानाला पाठिंबा दिला होता. ऑस्ट्रेलियाकडून चांगला खेळ आणि मैदानावर चांगला व्यवहार केला जाईल असे म्हटले गेले होते. पण कसोटी मालिका पुढे सरकू लागली ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू आणि प्रेक्षकांनी खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली. ऑस्ट्रेलियातील मीडियाने भारतीय संघ मैदानाबाहेर कसा चुकीचा वागतो, नियम पाळत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना शिविगाळ केली आणि त्यांच्यावर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. हे सर्व कमी पडले म्हणून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानावर स्लेजिंग इतक्या प्रमाणात केले की कर्णधार टीम पेन, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसहा अन्य काही खेळाडूंना त्यासाठी माफी मागावी लागली. वाचा- ऑस्ट्रेलियाला विसरला की तेव्हा विराटने इज्जत मिळून दिली होती... जागतिक क्रिकेटमध्ये एक वेळी अशी होती की सर्वजण स्टीव्ह स्मिथला विश्वासघातकी म्हणून चिडवत होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या बॉल टेंपरिंग प्रकरणानंतर जेव्हा स्मिथ इंग्लंडमध्ये २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यास आला तेव्हा इंग्लंडमधील प्रेक्षकांनी त्याला चीटर म्हणून चिडवण्यास सुरूवा केली. प्रेक्षकांनी त्याला हैराण केले होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी कोणी त्याची बाजू घेतली नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला आत्मविश्वास दिला आणि प्रेक्षकांकडून इज्जत मिळून दिली. पण सध्या स्मिथ आणि त्यांचा संघ विराटने केलेले ते कृत्य विसरून गेले आहेत असे दिसते. वाचा- व्यवहार आणि रणनिती दोन्हीमध्ये सभ्यपणा नाही मेलबर्न कसोटीनंतर सिडनी क्रिकेट मैदानापर्यंत जे काही झाले ते पाहता हे स्पष्टपणे जाणवते की ना बदलला आहे ना ऑस्ट्रेलियाचा संघ बॉल टेंपरिंग प्रकरणातून काही शिकला आहे. भारतीय खेळाडूंवर स्लेजिंग करणे, मुद्दाम बॉडी लाइन गोलंदाजी करणे असे प्रकार ऑस्ट्रेलियाकडून केले जात आहेत. यामुळे मोहम्मद शमी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत, हनुमा विहारी सारखे खेळाडू दुखापतग्रस्त झालेत. गली बॉय क्रिकेट बुकमध्ये स्मिथच्या नावावर अनेक विक्रम असतील आणि त्याचा सामावेश दिग्गज खेळाडूंमध्ये होत असेल. पण त्याचा आणि संघाचा व्यवहार हा गली बॉय प्रमाणेच दिसतोय. इतक नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जे समालोचक म्हणून काम करत आहेत ते देखील सहपणे अपशब्दांचा वापर करतात असे दिसून आले. भारताच्या पहिल्या पराभवानंतर शेन वॉनने असे शब्द वापरले होते. या उलट भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौवर गांगुली, एमएस धोनी हे खेळाडूतर सोडाच पण आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणारा देखील कधीच मैदानावर असे वागत नाही. विराट अनेक पटीने चांगला... करिअरच्या सुरुवातीला बॅड बॉय अशी प्रतिमा असलेल्या विराट कोहलीने प्रतिस्पर्धी खेळाडू (स्मिथ)ला इज्जत मिळून दिली म्हणून आयसीसीने स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार दिला. यावरून हेच सिद्ध होते की स्मिथ सारखे खेळाडू सभ्य क्रिकेटचा फक्त आव आणतात. अर्थात सिडनीत झालेल्या प्रकारावर त्याने माफी मागितली आहे त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये काही चांगल्या व्यवहाराची अपेक्षा आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i6x0nQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...