सिडनी : भारताविरुद्ध झालेल्या सिडनी येथील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या स्लेजिंग आणि अन्य गोष्टींमुळे फक्त भारतीय माजी खेळाडू नाही तर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू त्यांच्यावर टीका करत आहेत. सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानावर जो व्यवहार केला त्यावरून त्यांनी हताश आणि संकुचित मानसिकतेची मर्यादा ओलांडली अशा शब्दात यजमान संघाला घरचा आहेर मिळाला आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे पाच फलंदाज बाद झाल्यानंतर जेव्हा हनुमा विहारी आणि () चिवट फलंदाजी करत होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ()ने अश्विनला बाद करण्यासाठी स्लेजिंगचा वापर केला. या घटनेवर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज विकेटकिपर आणि फलंदाज () यांनी पेनला फटकारले आहे. एसईएन रोडिओवर बोलताना हिली म्हणाले, त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. टीम पेन अधिक हताश झाला होता. त्याची मानसिकता देखील संकुचित झाली होती. पण अश्विनकडे त्या सर्व गोष्टीचे उत्तर होते. सामना झाल्यानंतर पेनने अश्विनविरुद्ध करण्यात आलेली स्लेजिंग ही सामन्यातील एक भाग असल्याचे म्हटले. पण हिली यांना त्यावर देखील त्याला फटकारले. तो चुकीचा आहे. असा प्रकार खेळाचा भाग असू शतक नाही. क्रिकेट नियम तयार करण्याआधी एक प्रस्तान नावावची गोष्टी आहे. जी कॉलिन क्राउड्रे यांनी तयार केली असून त्यात क्रिकेट खेळण्याचे प्रकार आणि तुम्ही कशा पद्धतीने क्रिकेट खेळले पाहिजे याबद्दल लिहले आहे, असे हिली म्हणाले. टीम पेनने अश्विनला स्लेजिंग केल्याच्या घटनेबद्दल माफी मागितली. मी चांगले नेतृत्व करू शकलो नाही अशी कबुली त्याने दिली. पाचव्या दिवशी अश्विन फलंदाजी करत असताना त्याचे लक्ष्य विचलित करण्यासाठी विकेटच्या मागून पेन सातत्याने काही ना काही बोलत होता. पण अश्विनने त्याला चोख उत्तर दिले आणि भारतीय संघाने कसोटी ड्रॉ केली. दोन्ही संघातील मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिसबेन येथे होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qira5Y
No comments:
Post a Comment