सिडनी: मैदानावर फक्त कामगिरीच्या जोरावर नव्हे तर अन्य मार्गाने विजय मिळवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया नेहमीच करत असते. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांविरुद्ध स्लेजिंग करून त्यांचे लक्ष्य विचलित करण्याची ऑस्ट्रेलियाची परंपरा आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटीत जेव्हा भारतीय फलंदाज चिवट बॅटिंग करत होते. तेव्हा त्यांचे लक्ष्य विचलीत करण्यासाठी स्लेजिंग सुरू केले. वाचा- पाचव्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी ऑस्ट्रेलिया गोलंदाजांचा घाम फोडला. पण हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर () आणि हनुमा विहारी यांनी चिवट फलंदाजी केली. या दोघांनी २५९ चेंडू खेळून काढले पण विकेट पडू दिली नाही. वाचा- अश्विन आणि विहारी मैदानात असताना ऑस्ट्रेलियाने त्यांना बाद करण्यासाठी आक्रमक गोलंदाजी केली. पण या दोघांनी विकेट पडू दिली नाही. अश्विनचे लक्ष्य विचलीत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अश्विनला म्हणाला, मी गाबा कसोटी (चौथी कसोटी) पर्यंत विजयासाठी वाट पाहू शकत नाही, असा टोला मारला. वाचा- त्यावर अश्विनने क्षणाचीही वाट न पाहता उत्तर दिले. तो म्हणाला, तु भारतात ये, मी तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची कसोटी मालिका असेल, अशा शब्दात सुनावले. वाचा- पेन आणि अश्विन यांच्यात झालेल्या या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी तिसऱ्या कसोटीत शुभमन गिल, ऋषभ पंत या भारतीय खेळाडूंच्या विरुद्ध स्लेजिंग केले. पण भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या या सर्व डावपेचांना पुरून उरले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3btZR4o
No comments:
Post a Comment