सिडनी, : चौथा कसोटी सामना १५ जानेवारीला सुरु होणार असून त्यापूर्वीच भारतीय संघाला अजून एक धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. रवींद्र जडेजा हा चौथा कसोटी सामना खेळमार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण त्याचबरोबर भारताचा एक महत्वाचा खेळाडूही चौथ्या सामन्यात खेळू शकणार नाही, असे दिसत आहे. तिसरा कसोटी सामना वाचवण्यात भारताच्या हनुमा विहारीने मोलाची भूमिका बजावली. दुखापतग्रस्त असूनही तो तीन तास खेळत राहीला. पण आता हनुमाची दुखापत बळावली असल्याचे म्हटले जात आहे. हनुमाची दुखापत गंभीर असून तो आता महिनाभर तरी क्रिकेट खेळू शकणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात हनुमा खेळणार नसल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. पण याबाबतचा अधिकृत खुलासा अजूनही बीसीसीआयने केलेला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळत असताना हनुमाच्या पायातील स्नायु दुखावले होते. त्यानंतर फिजिओच्या मदतीने वैद्यकीय उपचार घेऊन हनुमा तीन तास फलंदाजी करत होता. त्यानंतर हनुमाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, पण त्याचा अहवाल अजूनही समजलेला नाही. मंगळवारी हनुमाच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल येणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमाची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे हनुमाला आता चार आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे, त्यानंतर त्याची फिटनेस टेस्ट होणार आहे. हनुमाला जर महिनाभर विश्रांती घ्यायची असेल तर त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. कारण चार आठवडे विश्रांती घेतल्यावर हनुमाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जावे लागणार आहे. तिथे त्याच्या दुखापतीचे पुनर्वसन होणार आहे. त्यानंतर हनुमाची फिटनेस टेस्ट होणार आहे. तोपर्यंत इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या मालिकेनंतरच हनुमा आपल्याला मैदानात दिसू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मंगळवारी हनुमाचा वैद्यकीय अहवाल आल्यावर बीसीसीआय नेमकी काय घोषणा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i5b8ZW
No comments:
Post a Comment