सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी भारताने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. अखेरच्या दिवशी भारताला जर विजय मिळवायचा असेल तर ३०९ धावा कराव्या लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानावर आहेत. वाचा- चौथ्या दिवशी मार्नस लाबुशेन ७३ धावांवर बाद झाला. त्याला नवदीप सैनीने माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडला आर. सैनीने त्याला ४ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. वेडच्या जागी आलेल्या कॅमरून ग्रीन याने स्टीव्ह स्मिथसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागदारी केली. ही जोडी आर अश्विनने फोडली. त्याने स्मिथला ८१ धावांवर बाद केले. वाचा- दरम्यान ग्रीनने अर्धशतक पूर्ण केले. दुसरे सत्र संपण्याआधी बुमराहने त्याला ८४ धावांवर बाद केले. ग्रीन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषीत केला आणि भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिले. भारतीय डावाची सुरुवात शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी सलग दुसऱ्यांदा अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी भारताला शतकाकडे घेऊन जाईल असे वाटत असताना पॅट कमिन्सने गिलची विकेट घेतली. तो ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. पण ५० धावा झाल्यानंतर तो लगेच बाद झाला. वाचा- चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा ९ धावांवर तर रहाणे ४ धावांवर नाबाद होते. अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशी भारताला ९० षटकात विजयासाठी ३०९ धावांची गरज आहे. भारतीय संघातील दोन फलंदाज जखमी आहेत. पंत आणि जडेजा यांना काल दुखापत झाली होती. यातील जडेजा चौथ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकेल का याबाबत शंका आहे. तर पंत देखील किती क्षमतेने खेळू शकेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दोन फलंदाज जखमी असल्यामुळे भारतीय संघ अखेरच्या दिवशी सामना ड्रॉ करण्यासाठी खेळण्याची शक्यता अधिक आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3se97zl
No comments:
Post a Comment