
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या रविंद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारताकडून सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जडेजाने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड अशा महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. वाचा- ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर (ravindra jadeja) सोशल मीडियावर चर्चेत आला. तुम्हाला वाटेल त्याने घेतलेल्या चार विकेटमुळे तो चर्चेत आला असेल. पण जडेजा चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात नाथन लायनची विकेट घेत जडेजाने त्यांना नववा धक्का दिला. त्यानंतर शतक झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. ऑस्ट्रेलिया ३५०च्या पुढे जाईल असे वाटत होते. तेव्हा जडेजाने शानदार थ्रो केला आणि स्मिथला धावबाद () केले. वाचा- जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर स्मिथने पहिली धाव घेतली. त्यानंतर तो दुसरी धाव घेण्यासाठी पळाला. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा जडेजा धावत आला आणि त्याने चेंडू थेड विकेटवर मारला. स्मिथने धावबाद होऊ नये म्हणून उडी मारली. पण जडेजाच्या थ्रो समोर तो क्रिझमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. स्मिथने २२६ चेंडूत १३१ धावा केल्या. वाचा- जडेजाच्या या थ्रोचे कौतुक समालोचक, माजी क्रिकेटपटू आणि चाहते करत आहेत. त्याच्या शानदार थ्रो मुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर संपुष्ठात आला. चीते का चाल, बाज की नजर आणि जडेजाचा थ्रो... रैना म्हणाला... ICC ने केले कौतुक... सूर्यकुमार यादव
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s2HwB7
No comments:
Post a Comment