
सिडनी, : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनला एकही विकेट मिळाली नाही. गेल्या सामन्यात अश्विनने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाजी स्टीव्हन स्मिथला झटपट बाद केले होते. पण या सामन्यात मात्र अश्विनला त्याची विकेट मिळता आली नाही. याबाबत स्मिथने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा केला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर स्मिथ अश्विनबाबत म्हणाला की, " आतापर्यंतच्या कसोटी मालिकेत मला अश्विनवर दडपण आणता आले नव्हते. त्यामुळे या गोष्टीवर मी विचार केला. अश्विनच्या समोर फलंदाजी करताना मी आक्रमकपणा दाखवला नाही, पण मी सकारात्मक नक्कीच होतो. अश्विनविरुद्ध खेळताना मी बॅटची ग्रीप घट्ट पकडली होती आणि या गोष्टीचा चांगलाच फायदा मला झाला. त्यामुळेच मी अश्विनच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करू शकलो." अश्विनने आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पण तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अश्विनला एकही विकेट मिळवता आली नाही. पण अश्विनला एक विकेट मिळवण्याची संधी आली होती, पण यषअटीरक्षक रिषभ पंतकडून मोठी चुक झाली आणि ही संधी भारतीय संघाला गमवावी लागली. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन यष्टीरक्षक रिषभ पंतवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. अश्विनचा राग यावेळी अनावर झाला होता. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरा सामना गाजवल्यावर अश्विनने या सामन्याच्या पहिल्या दिवशीही चांगली गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी जेव्हा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा जेव्हा २६ धावांवर खेळत होता. तेव्हा अश्विनने पुकोव्हस्कीला चांगलेच चकवले होते. यावेळी पुकोव्हस्कीच्या बॅटची कडा अश्विनने टाकलेल्या चेंडूने घेतली होती. त्यावेळी हा चेंडू थेट पंतच्या ग्लोव्हजमध्ये जात होता. पंतसाठी हा एक सोपा झेल होता. पण पंतने हा झेल सोडला आणि त्यानंतर अश्विन चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. या जीवदानाचा चांगलाच फायदा पुकोव्हस्कीने उठवला आणि त्याने या सामन्यात अर्धशतकही झळकावले. पुकोव्हस्कीला मिळालेले हे पहिले जीवदान होते. त्यानंतरच्या पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पंतने पुन्हा एकदा एक झेल सोडला. या दोन जीवदानांचा चांगलाच फायदा यावेळी पुकोव्हस्कीला मिळालाय त्याचबरोबर २९ व्या षटकात पुकोव्हस्कीला धावचीत करण्याची संधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडेही होती. पण यावेळी बुमराचा पाय घसरला आणि पुकोव्हस्कीला तिसऱ्यांदा जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुकोव्हस्कीने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर या मैदानात पदार्पणात अर्धशतक झळकावणारा पुकोव्हस्की हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात युवा खेळाडू ठरला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/399KKdt
No comments:
Post a Comment