Ads

Tuesday, December 15, 2020

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ ७५ वर्ष या मैदानावर पराभूत झाला नाही

नवी दिल्ली: क्रिकेट संदर्भात ऑस्ट्रेलियाचा इतिहास हा फार जून आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्न येथे १८७७ साली खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या पासूनच दबदबा राहिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने २०१८-१९ साली ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला होता. इतिहास भारत पुन्हा करणार का याची उत्सुकता सर्वांना आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर संघात परत आल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला आहे. या पाश्वभूमीवर ऑस्ट्रेलिया क्रिकेटशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात... वाचा- आठ चेंडूचे ओव्हर क्रिकेटच्या फार कमी चाहत्यांना याबद्दल माहिती असेल की ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ८ चेंडू टाकेल जात असत. १९२४-२५ आणि त्यानंतर १९३६-३७ ते १९७८-७९ या काळात ऑस्ट्रेलियातील देशांतर्ग सामन्यात एका ओव्हरमध्ये ८ वेळा चेंडू टाकले जात. ऑस्ट्रेलिया शिवाय दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि इंग्लंड या देशांनी देखील कधी ना कधी कसोटी क्रिकेटमध्ये ८ चेंडू वापरले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात १९७८-७९ साली झालेल्या कसोटी सामन्यात अखेरची ८ चेंडूंची ओव्हर टाकली गेली होती. भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमीच एका ओव्हरमध्ये ६ वेळा चेंडू टाकण्याचा नियम स्विकारला. ७५ वर्ष लॉर्ड्सवर पराभव झाला नाही कसोटी क्रिकेटमध्ये ज्या मालिका या जगभरातील क्रिकेट चाहते पाहतात त्यामध्ये एशेस सिरीजचा समावेश होतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरी पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने १९३४ साली एशेस मालिकेत लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पराभव स्विकारला होता. त्यानंतर क्रिकेटची पंढरी मानल्या गेलेल्या या मैदानावर ७५ वर्ष त्यांचा पराभव झाला नाही. त्या काळात त्यांनी लॉर्ड्सवर १८ कोसटी सामने जिंकले. अपराजयाची ही मालिका २००९ साली तुटली जेव्हा इंग्लंडने त्यांचा ११५ धावांनी पराभव केला. फक्त ६ षटकार क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी १९२८ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ब्रॅडमन यांनी १९४८ साली इंग्लंड विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यांनी ५२ कसोटी सामन्यात ९९.९४च्या सरासरीने ६ हजार ९९६ धावा केल्या. ब्रॅडमन नावावर २९ शतके आणि १३ अर्धशतकांची नोंद आहे. पण या महान फलंदाजाने त्याच्या करिअरमध्ये फक्त ६ षटकार मारलेत. सात कसोटी सामन्यांची कसोटी मालिका... १९७०-७१ साली एशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे यजमानपद होते. तेव्हा ऑस्ट्रेलियाने सात सामन्यांची कसोटी मालिका खेळवली होती. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. इंग्लंडने तेव्हा मालिका २-०ने जिंकली. त्यांनी चौथा आणि सातवा कोसटी सामना जिंकला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बिल लॉरी यांना मालिकेच्या मध्येच कर्णधारपदावरून दूर केले होते. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील अशी ही पहिली घटना होती. सहावा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर बिल लॉरी यांना कर्णधारपदावरून दूर केले होते. त्यांच्या जागी इयान चॅपल यांना कर्णधार करण्यात आले होते. अॅल्युमिनियमच्या बॅटने फलंदाजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १९७९ साली झालेल्या मालिकेतील पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ बाद २३२ धावा केल्या होत्या. नवव्या क्रमांकावर डिनेस लिलीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद ११ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी फलंदाजीला येताना अॅल्युमिनियमची बॅट आणली होती. फलंदाजी करताना चौथ्याच चेंडूवर शॉट मारताना आवाज आला. इंग्लंडचा कर्णधार माइक बॅयरली यांनी अंपायरकडे तक्रार केली. पण लिलीने लाकडाची बॅट घेण्यास नकार दिला. तोपर्यंत आयसीसीने असा कोणताही नियम तयार केला नव्हता ज्यात बॅट कोणत्या वस्तूपासून तयार केलेली असावी असा उल्लेख केला असेल. अखेर ग्रेग चॅपल यांनी लाकडी बॅट घेतली आणि लिली यांना समजावले. शेवटी लिली यांनी अॅल्युमिनियमची बॅट सोडून दिली. या सामन्यात लिली १८ धाांवर बाद झाले. नंतर गोलंदाजी करत त्यांनी ७३ धावा देत चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने ही लढत १३८ धावांनी जिंकली. विशेष म्हणजे लिली यांनी १२ दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध हीच बॅट वापरली होती. तेव्हा ते पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. दूध विकणारा क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचा धमाकेदार जलद गोलंदाज रॉडनी हॉग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १२३ विकेट घेतल्या. पण ते एक दूधविक्रेते होते. निवृत्तीनंतर देखील हॉग यांनी मेलबर्न येथे फळ विक्रीचे दुकान सुरु केले होते. भावामुळे ९९ धावांवर नाबाद स्टीव्ह वॉच्या करिअरमध्ये असा एक काळ होता की तो सातत्याने ९०मध्ये बाद होत होता. फेब्रुवारी १९९५ साली पर्थ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्टीव्ह वॉ ९९ वर नाबाद राहिला. त्याचा भाऊ मार्क वॉ ११वा फलंदाज क्रेग मॅकड्रमटसाठी रनर म्हणून आला. मॅकड्रमट चेंडू मारला पण तेव्हा मार्क वॉ क्रीझपासून बाहेर आले होते आणि ते धावबाद झाले. स्टीव्ह वॉ प्रथमच ९९ धावावर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी ३२९ धावांनी जिंकली. वॉ कसोटी करिअरमध्ये १० वेळा ९०मध्ये राहिला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37kqYwo

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...