Ads

Wednesday, December 2, 2020

IND vs AUS: भारताच्या विजयाचा मार्ग झाला सोपा, मुंबईकर शार्दुल ठाकूरने केली भन्नाट कामगिरी

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा विजयाचा मार्ग थोडासा सोपा झालेला पाहायला मिळत आहे. कारण आजच्या सामन्यात संधी मिळालेला मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने या सामन्यात भन्नाट कामगिरी केली आहे. शार्दुलच्या या कामगिरीमुळे भारताला विजय मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. आज पहिल्यांदाच मुंबईकर शार्दुलला भारताकडून या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने शार्दुलने केले आहे. कारण भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथला शार्दुलने फक्त सात धावांवर बाद केले आहे. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथने शतके झळकावली होती. त्याचबरोबर दोन्ही सामन्यांमध्ये स्मिथला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये धावांचा जो गॅप होता तो आता भारताने स्मिथला बाद करत भरून काढला आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो, असे चाहते म्हणत आहेत. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही स्मिथने शतक झळकावत १०४ धावा केल्या होत्या. स्मिथच्या या दोन शतकी खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यांमध्ये ३५०पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारता आला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण तिसऱ्या सामन्यात पराभूत होण्याची नाचक्की भारतीय संघावर येते का, हे तिसऱ्या सामन्यात समजू शकणार आहे. भारताने मालिका गमावली असली तरी हा सामना जिंकून भारत आपली लाज वाचवू शकतो, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये भारतीय संघ कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर आपला तिसरा सामना खेळत आहे. पण आतापर्यंत भारताला या मैदानात एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भारताने हा सामना जर जिंकला तर त्यांचा हा १२ वर्षांतील पहिला विजय असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३०२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहली, आणि यांनी अर्धशतकी खेळी केली. भारतीय फलंदाजांना या सामन्यात काही विशेष प्रभाव टाकता आला नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2I0lcpL

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...