अॅडलेड, : भारताचा कर्णधार विराट कोहली हा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पृथ्वी शॉकडून क्षेत्ररक्षण करताना मोठी चुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कोहलीचा संताप अनावर झाला आणि त्याने पृथ्वीला अपशब्द वापरले. पृथ्वीने यावेळी नेमकी कोणती मोठी चुक केली, याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. ही गोष्टी घडली ती २३व्या षटकात. त्यावेळी भारताचा जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत होता. या षटकात बुमराने एक बाऊन्सर टाकला. या बाऊन्सरवर मार्नस लाबुशेनने पुलचा फटका मारला. त्यावेळी हा चेंडू हवे उडाला आणि पृथ्वी तिथे फिल्डिंग करत होता. पृथ्वीसाठी हा एक चांगला झेल होता. पण पृथ्वी यावेळी गडबडला आणि त्याने हा झेल सोडला. त्यानंतर कोहलीचा राग अनावर झाला आणि कोहलीने पृथ्वीला शिवी दिल्याची चर्चा चाहते करत होते. पृथ्वी सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघत नाहीत. पहिल्या डावात तर पृथ्वीला भोपळाही फोडता आला नव्हता. त्याचबरोबर त्याला चांगली फिल्डींगही करायला जमत नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. लाबुशेनला यावेळी तीन जीवदान मिळाले. बुमरा आणि वृद्धिमाना साहा या दोघांनीही लाबुशेनला जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या डे-नाइट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताची ६ बाद २३३ अशी स्थिती होती. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा करता आल्या. भारताचा पहिल्या डाव २४४ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सुरूवात झाली आणि भारतीय गोलंदाजांनी देखील घातक गोलंदाजी काय असते हे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी डावाची सुरूवात केली. या जोडीने पहिली धाव घेण्यासाठी २८ चेंडू घेतले. ऑस्ट्रेलिया संघाची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात संथ सुरूवात आहे. वेड आणि बर्न्स यांनी ४.३ ओव्हरपर्यंत एकही धाव काढली नाही. भारताकडून उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी या ओव्हर टाकल्या. यादवने टाकलेल्या पाचव्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर वेडने कव्हर्सच्या दिशेने चौकार मारला आणि ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37ulsHg
No comments:
Post a Comment