
कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना उद्या कॅनबेरा येथे रंगणार आहे. भारतीय संघाला आपली लाच वाचवण्यासाठी ही अखेरची संधी असेल. पण या तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली जर टॉस हरला तर भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित समजला जात आहे. सिडनीतील दोन्ही वनडे सामने भारताने गमावले आहेत. पण तिसरा वनडे सामना हा कॅनबेरा येथील मानुका ओव्हल या मैदानावर होणार आहे. या मैदानात नाणेफेकीचा कौल महत्वाचा समजला जातो. कारण गेल्या सात सामन्यांमध्ये ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे, त्यांनाच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ या मैदानात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्यासाठीच प्राधान्य देत असतो. त्यामुळे उद्याच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने नाणेफेक गमावली आणि ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर गेल्या सात सामन्यांतील निकालानुसार भारताला पराभव पत्करावा लागू शकतो. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौलही महत्वाचा असेल. आतापर्यंत झालेल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी केली होती आणि दोन्ही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला, हे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर भारताला विजय मिळवायचा असेल तर त्यांनी प्रथम फलंदाजी करायला हवी. त्यासाठी नाणेफेकीचा कौल हा सर्वात महत्वाचा ठरणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर या मैदानातील विक्रमानुसार भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसू शकतो. त्यामुळे या सामन्यात नाणेफेकीचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागतो आणि कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये कोहली आतापर्यंत एकदाही टॉस जिंकू शकलेला नाही. नाणेफेकीचा कौल कोहलीच्या बाजूने न लागल्यामुळेच भारतीय संघाला दोन्ही सामन्यांत दुसऱ्यांना फलंदाजी करावी लागली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. पण ही गोष्ट जर तिसऱ्या सामन्यात बदलली तर नक्कीच काही तरी फरक पडू शकतो आणि भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो, असे चाहत्यांना वाटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fT0UuE
No comments:
Post a Comment