सिडनी: 2nd practice match भारतीय क्रिकेट संघातील विकेटकिपर () ने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या सराव सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी सुरू असलेल्या डे-नाइट सराव सामन्यात पंतने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध तुफानी शतक केले. त्याने फक्त ७३ चेंडूत शतक पूर्ण केले. अखेरच्या षटकात त्याने २२ धावा केल्या आणि शतक झळकावले. वाचा- पंतच्या या धमाकेदार शतकामुळे भारताने ४७२ धावांची मोठी आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताने फक्त १९४ धावा केल्या होत्या. तेव्हा जसप्रीत बुमराहच्या अर्धशतकी खेळीमुळे भारत २००च्या जवळ पोहोचला होता. दुसऱ्या डावात पंतच्या आधी ( ) ने शतक पूर्ण केले. त्याने १९४ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावा केल्या. तर पंतने ७३ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांसह १०३ धावा केल्या. वाचा- पंत आणि विराहीच्या शतकांमुळे भारताने दुसऱ्या डाात ४ बाद ३८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फक्त १०८ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ फक्त ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी अर्धशतक केले. गिल ६५ धावांवर बाद झाला तर अग्रवाल ६१ धावांवर माघारी परतला. कर्णधार अजिंक्य रहाणे ३८ धावा करू शकला. वाचा- .... भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याआधी पंतने सराव सामन्याचा फायदा घेतला आणि धमाकेदार फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशाच्या अखेरच्या षटकात त्याने २२ धावा केल्या आणि शतक पूर्ण केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mbDSRr
No comments:
Post a Comment