कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३०२ धावा उभ्या केल्या. भारताकडून आघाडी आणि मधळ्या फळीतील फलंदाजांनी नव्हे तर पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आलेल्या आणि यांनी धमाकेदार खेळी करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. वाचा- हार्दिकने ७६ चेंडूत नाबाद ९२ तर जडेजाने ५० चेंडूत ६६ धावा केल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. या कामगिरीसह त्यांनी एक खास विक्रम केला. भारताकडून सहाव्या विकेटसाठी १५०ची भागिदारी होण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताकडून सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रम स्टुअर्ट बिन्नी आणि अंबाती रायडू यांच्या नावावर आहे. त्यांनी २०१५ साली झिम्बाब्वे विरुद्ध १६० धावांची भागिदारी केली होती.युवराज सिंग आणि एमएस धोनी यांचा क्रमांक लागतो. त्यांनी २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध १५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर हार्दिक आणि जडेजा या जोडीचा क्रमांक लागतो. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५० धावांची भागिदारी केली. वाचा- हार्दिकने आज ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ९२ धावा केल्या. वनडेतील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर जडेजाने ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. या दोघांमुळे भारताला ३०२ पर्यंत मजल मारता आली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Vswkik
No comments:
Post a Comment