
नवी दिल्ली: भारत विरोधी वक्तव्य करून प्रसिद्धीला येणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ( ) ने आता मैदानावर राडा केला आहे. सध्या () स्पर्धेत खेळणाऱ्या आफ्रिदीने एका २१ वर्षाच्या युवा खेळाडूसोबत वाद घातला. वाचा- LPL मध्ये ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत कॅडी टस्कर्स आणि गॉल ग्लॅडिएटर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत टस्कर्सने २५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ग्लॅडिएटर्सकडून खेळणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीने कॅडी टस्कर्सच्या युवा गोलंदाज सोबत वाद घातला. या दोघांच्यात मैदानात वाद सुरू झाला आणि तो मिटवण्यासाठी दोन्ही संघातील अन्य खेळाडूंना यावे लागले. वाचा- अफगाणिस्तानचा २१ वर्षाचा खेळाडू नवीनला आफ्रीदीने मैदानावर धमकी दिली. एका पाकिस्तानी पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार मैदानात दोघांमध्ये वाद सुरू असताना आफ्रीदी त्याला म्हणाला, तु जेव्हा जन्माला आला नव्हतात तेव्हापासून मी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करतोय. वाचा- करू या सामन्यात कॅडी टस्कर्सने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १९६ धावा केल्या. उत्तरादाखल गॉले ग्लॅडिएटर्सला ७ बाद १७१ धावा करता आल्या. या सामन्यात आफ्रीदीला भोपळा फोडता आला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36lTKMu
No comments:
Post a Comment