
मेलबर्न: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. कोरना लॉकडाउनंतर ऑस्ट्रेलियात प्रथमच आंतरारष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. अशातच एक वादाला सुरुवात झाली आहे. वाचा- आणि यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आता संबंधित चॅनलने दोन्ही क्रिकेट बोर्डातील काय संवाद झाला याची माहिती मागत न्यायालयात धाव घेतली आहे. इतक नव्हे तर चॅनल सेव्हनने सीए म्हणजेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला घाबरते असे म्हटले आहे. वाचा- सिडनी मॉर्निंग हेराल्डनुसार चॅनल सेव्हनने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेल्याचे म्हटले आहे. चॅनलने केलेल्या दाव्यानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआच्या हिताचा विचार करून भारताच्या दौऱ्यात बदल करून प्रसारण कराराचे उल्लंघन केले आहे. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्याची सुरूवात वनडे आणि टी-२० मालिके ऐवजी डे-नाइट कसोटीने करायची होती. जी सध्याच्या कार्यक्रमानुसार १७ डिसेंबर रोजी एडिलेडमध्ये खेळवली जाणार आहे, असे सेव्हन वेस्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वॉरबर्टन म्हणाले. ही गोष्टी लाजिरवाणी आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे प्रसारणकर्ते म्हणून आमचा सन्मान करत नाही आणि बीसीसीआयच्या पुढे शेपूट घालते ते बीसीसीआयशी घाबरतात, असे ही वॉरबर्टन म्हणाले. वाचा- सीएचे अधिकारी, आणि अन्य प्रसारणकर्ता फॉक्सवेल आपल्या मर्जीनुसार कारभार करत आहेत. भारताच्या दौऱ्याला अंतिम रुप देण्याच्या संदर्भात सीए, बीसीसीआय, फॉक्स्टेल आणि राज्य सरकारांचे अधिकारी यांच्यात झालेले ई-मेल संवाद चॅनल सेव्हनला पाहायचे आहेत. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ociQ6I
No comments:
Post a Comment