
नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची लढत २ डिसेंबर रोजी कॅनबरा येथे होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन लढतीत विजय मिळवून मालिकेत विजय आघाडी मिळवली आहे. आता तिसऱ्या लढतीत विजय मिळवून भारताला क्लीन स्वीप देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. जर असे झाले तर भारतीय संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला जाईल. टीम इंडियाचा ३१ वर्षानंतर प्रथम सहा वनडे सामन्यात पराभव होईल. वाचा- भारतीय क्रिकेट संघाने याआधी सलग सहा वनडेत पराभव स्विकारून ३१ वर्ष झाली. ७ मार्च १९८९ ते १५ ऑक्टोबर १९८९ या काळात भारताचा सहा वनडे सामन्यात पराभव झाला होता. तेव्हा वेस्ट इंडिज सहा वनडे सामन्याच्या मालिकेत भारताचा क्लीन स्वीप केला होता. त्यानंतर सातव्या लढतीत शारजामध्ये भारताचा पाकिस्तानने पराभव केला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दिलीप वेंगसरकर कर्णधार होते. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कृष्णामचारी श्रीकांत हे नेतृत्व करत होते. पण त्याननंतर कधीच सलग सहा सामन्यात भारताचा पराभव झाला नाही. वाचा- सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या सलग दोन वनडेत पराभव झाल्याने भारतीय संघाचा पाच सामन्यात पराभव झालाय. याआधी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा पराभव झाला होता. तेव्हा भारताने मालिका ३-०ने गमावली होती. नियमीत गोलंदाजांना बॅकअप म्हणून पर्यायी गोलंदाज नसल्यामुळे आणि फलंदाजीत अपेक्षित कामगिरी न केल्याने भारताला पराभव स्विकारावा लागला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दोन पराभवामुळे ही गोष्टी स्पष्ट झाली आहे की, भारताच्या खेळाडूंनी सलग दोन महिने टी-२० खेळल्यामुळे आता ५० षटकाच्या क्रिकेट सामन्यात स्वत:ला फिट बसताना त्यांना अडचणी येत आहेत. ही गोष्ट स्वत: कर्णधार विराट कोहलीने देखील मान्य केली आहे. आम्ही टी-२० खेळत होतो. ज्याचा परिणाम वनडे सामन्यात होत असेल. २५ षटकानंतर आम्ही शैली खराब होत असल्याचे विराट म्हणाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mCMtgM
No comments:
Post a Comment