Ads

Saturday, January 9, 2021

शिविगाळ करून माझे करिअर संपवण्याची धमकी दिली; भारतीय क्रिकेटच्या आरोपाने खळबळ

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे थांबवण्यात आलेल्या देशातील क्रिकेट स्पर्धा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत. टी-२० स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. पण त्याआधी एक मोठा वादाला सुरूवात झाली. बडोदा संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाने पहिल्या सामन्यातून माघार घेतली आहे. दीपकने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून क्रुणाल पंड्याची तक्रार केली आहे. वाचा- दीपक हुडाने आरोप केला आहे की पंड्याने त्याच्याविरुद्ध अभद्र भाषा वापरली आणि क्रिकेट करिअर संपवण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री बायो बबल वातावरणातून बाहेर पडला. त्याच्या या निर्णयामुळे संघ आणि प्रशिक्षक अडचणीत आले आहेत. हुडा संघातील वरिष्ठ खेळाडू असून संघातील महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे. वाचा- मी गेल्या ११ वर्षापासून बडोदा क्रिकेट असोसिएशनकडून खेळत आहे. मला सैय्यद मुश्तात अली स्पर्धेसाटी निवडण्यात आले. पण मला उत्साह वाटत नाही, मी तणावग्रस्त आणि दबावात आहे. गेल्या चार दिवसांपासून माझ्या संघाचा कर्णधार संघातील खेळाडू आणि अन्य राज्यातून स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंसमोर मला शिविगाळ करत आहे. इतक नव्हे तर माझा सराव थांबवून दादागिरी केली, असे दीपक हुडाने म्हटले आहे. वाचा- हुडाने बडोदाकडून ४६ प्रथम श्रेणी तर १२३ टी-२० सामने खेळले आहेत. अशा वातावरणात मी चांगली कामगिरी करू शकत नाही असे हुडाने म्हटले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LzteqY

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...