
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्रातील बराच वेळ पावसामुळे वाया गेला. मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरची विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. वाचा- सिडनी कसोटीत भारतीय संघातील काही खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल. भारतीय संघात समावेश झालेला स्टार सलामीवीर ( )ला या सामन्यात एक अनोखा विक्रम करण्याची संधी आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ९९ षटकार मारले आहेत. सिडनी कसोटीत त्याने एक षटकार मारल्यास १०० षटकार पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरले. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२२ षटकार मारले आहेत. रोहितनंतर भारताचा सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ६० षटकार मारले आहेत. वाचा- भारताचा कसोटी खेळाडू चेतेश्ववर पुजारा याला सिडनी कसोटीत महत्त्वाचा टप्पा पार करण्याची संधी आहे. कसोटीत ६ हजार धावा करण्यासाठी त्याला ९७ धावांची गरज आहे. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली तर तो अशी कामगिरी करणारा ११ वा आणि वेगाने ६ हजार धावा करणारा आठवा खेळाडू ठरले. पुजाराने कसोटीत अखेरचे शतक याच मैदानावर झळकावले होते. वाचा- विराट कौहलीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणे याला देखील एका विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या चार कसोटीत विजय मिळवला होता. रहाणेने पहिल्या ३ कसोटीत विजय मिळून दिला आहे. जर सिडनीत भारताने विजय मिळवला तर तो धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XfIEmX
No comments:
Post a Comment