
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरूवात झाली. या सामन्यात () या महिलने एक विक्रम केला आहे. पुरुषांच्या कसोटी सामन्यात अंपायर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला सामना अधिकारी ठरल्या आहेत. वाचा- ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सच्या ३२ वर्षीय पोलोसाक या तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या पंच म्हणून काम करणार आहेत. याआधी पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये अंपायरची भूमिका बजावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी २०१९ साली नामिबिया आणि ओमान यांच्यातील दोन लढतीत अंपायर म्हणून काम पाहिले होते. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या लढतीत मैदानावरील अंपायर म्हणून पॉल रिफेल आणि पॉल विल्सन हे काम पाहणार आहेत. तर ब्रूस ऑक्सेनफोर्ड हे तिसरे अंपायर असतील. डेव्हिड बून हे सामनाअधिकारी आहेत. कसोटी सामन्यासाठी आयसीसीच्या नियमानुसार यजमान देश चौथा अंपायर म्हणून आपल्याच देशातील आयसीसीच्या अंपायरची नियुक्ती करू शकते. पोलोसाक यांनी ऑस्ट्रेलियामध्ये २०१७ साली देशांतर्गत पुरुषांच्या लिस्ट ए सामन्यात अंपायर म्हणून काम केले होते. तेव्हा देखील पुरुषांच्या सामन्यात अंपायर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. वाचा- चौथ्या अंपायरचे काम कसोटी चौथ्या अंपायरचे काम मैदाना नवा चेंडू घेऊन येणे, मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरसाठी ड्रिंक देणे, लंच आणि चहापानाच्या वेळी पिचची देखभाल करणे, मैदानावरील लाइट व्यवस्था पाहाणे आदी गोष्टींचा समावेश होतो. जर मैदानावरील अंपायर काही कारणामुळे बाहेर आले तर त्याच्या जागी तिसऱ्या अंपायरला जबाबदारी पार पाडावी लागते. अशा परिस्थितीत चौथा अंपायर हा तिसऱ्या अंपायरची भूमिका पार पाडतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pTyLre
No comments:
Post a Comment