Ads

Monday, January 11, 2021

IND vs AUS : लढवय्या बाणा... गंभीर दुखापत असूनही भारतीय फलंदाजाने लढवला तीन तास किल्ला

सिडनी, : भारतीय संघाने तिसरा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. पण यावेळी भारतीय खेळाडूचा लढवय्या बाणाही सर्वांना पाहायला मिळाला. गंभीर दुखापत होऊनही भारतीय खेळाडूने तीन तास फलंदाजी करत भारताचा किल्ला लढवला आणि संघाला सामना वाचवण्यात मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. भारताचा फलंदाज हनुमा विहारीला पाचव्या दिवशी गंभीर दुखापत झाली होती. त्याचे पायांचे स्नायू दुखावले होते. पायांचे स्नायू दुखावल्यावर काही वेळा खेळाडूला उभेही राहता येत नाही. पण विहारीने यावेळी फिजिओची मदत घेतली आणि दुखापत असतानाही तीन तास फलंदाजी केली. विहारीच्या या कामगिरीमुळेच भारतीय संघाला हा सामना वाचवता आला. कारण विहारी जर दुखापतीमुळे मैदान सोडून गेला असता तर भारताचे तळाचे फलंदाज खेळआयला आले असते आणि त्यांना बाद करणे ऑस्ट्रेलियाच्या संघाला तुलनेने सोपे गेले असते. पण विहारीने यावेळी लढवय्या बाणा दाखवला आणि भारतीय संघासाठी ही जमेची बाजू ठरल्याचे पाहायला मिळाले. विहारीने यावेळी तब्बल १६१ चेंडूंचा सामना करत नाबाद २३ धावा केल्या आणि संयमी फलंदाजी करत भारताला सामना वाचवण्यात चांगले योगदान दिले. जखमी हनुमा विहारी आणि आर अश्विन या दोघांनी केलेल्या बचावात्मक फलंदाजीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. पाचव्या दिवशी भारती संघाला विजयासाठी ३०९ धावांची गरज होती. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागिदारीने भारताच्या विजयाची आशा निर्माण केली होती. पण ही जोडी बाद झाल्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी साडेतीन तासाहून अधिक वेळ आणि २५० हून अधिक चेंडू खेळून सामना वाचवला. तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यांवर सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आजच्या दिवशी भारताने कालच्या २ बाद ९८ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मैदानावर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाज होते. कालच्या धावसंख्येत सहा धावांची भर टाकल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला. कर्णधार रहाणे ४ धावा करून बाद झाला. त्याला नाथन लायनने बाद केले. त्यानंतर हनुमा विहारीच्या आधी ऋषभ पंत फलंदाजीला आला. भारताच्या डावातील ही महत्त्वाची घटना ठरली. पंतने पुजारासह चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची भागिदारी केली. पंत आणि पुजाराने पहिल्या सत्रात भारताचे पारडे जड केले. भारत हा सामना वाचवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी खेळत आहे हे पंत-पुजारीच्या भागिदारीने दाखवून दिले. दुसऱ्या सत्रात पंत शतकाच्या जवळ आल्यावर बाद झाला. लायनने ९७ धावांवर त्याची विकेट घेतली. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारासह ९७ धावा केल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q8rjIR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...