Ads

Thursday, December 3, 2020

IND vs AUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० भारताचे पारडे जड; हे आहे कारण

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने वनडे मालिका गमावली असली तरी अखेरच्या वनडेत विजय मिळवल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला असेल. दोन्ही संघात आजपासून टी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. भारतीय संघ टी-२० मालिकेची सुरूवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका २-१ने जिंकली होती. ज्या मैदानावर भारताने वनडे लढत जिंकली होती तेथेच पहिली टी-२० लढत होत आहे. कॅनबेरा येथे भारताने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला होता. वाचा- टीम इंडियाने वनडे मालिका गमावली असली तरी ऑस्ट्रेलियामध्ये भारताची टी-२० मधील कामगिरी चांगली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत ९ टी-२० सामने खेळेल आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन वेळा ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला. एका सामन्याचा निकाल लागला नाही. यातील विशेष बाब म्हणजे भारताने ऑस्ट्रेलियात एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. वाचा- पहिल्या वनडेत पराभव झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडू टी-२० क्रिकेटमधून बाहेर पडले नाहीत, असे वक्तव्य केले होते. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील खेळाडूंसमोर एक मोठे आव्हान आहे म्हणजे ४८ तासात वनडे क्रिकेटमधऊन टी-२० क्रिकेटशी एकरुप होण्याचे. अर्थात भारतीय खेळाडूंना एका महिन्यापूर्वीच आयपीएल खेळली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्टी फार कठीण असणार नाही. वाचा- भारतीय संघाकडे टी-२० साठी वेगळी टीम आहे. १६ पैकी १४ असे खेळाडू आहेत जे वनडे संघात देखील होते. दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे टी-२० संघात आहेत. ऑस्ट्रेलियाने मात्र वनडे आणि टी-२० साठी एकच संघ ठेवला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3onRDhc

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...