Ads

Friday, December 4, 2020

IND vs AUS : पहिल्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल, अव्वल गोलंदाज संघाबाहेर

कॅनबेरा, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले. कारण पहिल्या सामन्यातच भारताच्या महत्वाच्या गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर संघात ७ महत्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. पहिल्याच सामन्यात भारताने एवढे बदल केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आजच्या सामन्याच जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक जसप्रीत बुमराला संधी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर या संघातील दोन्ही अनुभवी फिरकीपटूंना स्थान देण्यात आलेले नाही. या संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आलेली नाही. चहलची पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये चांगलीच धुलाई झाली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या वनडे सामन्यात वगळण्यात आले होते. चहलच्या जागी कुलदीपला संधी देण्यात आली होती. कुलदीपने तिसऱ्या वनडेमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण कुलदीपला आजच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. पण या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर या युवा फिरकीपटूला स्थान देण्यात आलेले आहे. भारताने बुमराला आजच्या सामन्यात खेळवलेले नाही. पण त्याच्याजागी संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरला संधी दिली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बुमराने चांगली गोलंदाजी केली होती. पण बुमराला आजच्या सामन्यात संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आजच्या ट्वेन्टी-२० सामन्यात टी. नटराजनला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. नटराजनचा हा पहिलाच ट्वेन्टी-२० सामना असेल. पहिल्या वनडे सामन्यातही नटराजनने चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारताच्या फलंदाजीमध्येटही मोठे बदल करण्यात आले आहे. भारतीय संघात यावेळी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आलेली नाही. पण भारताच्या फलंदाजीमध्ये मनीष पांडे आणि संजू सॅमसन यांना स्थान देण्यात आलेले आहे. मनीष यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, तर संजूला पाचवे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाने फार मोठे बदल केले आहेत. त्यामुळे या सामन्यात संधी मिळालेल्या खेळाडूंकडून नेमकी कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mGsBto

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...