![](https://maharashtratimes.com/photo/79811006/photo-79811006.jpg)
अॅडलेड : : भारतीय संघाच्या मानहानीकारक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. पण भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने यावेळी भारतीय संघावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. सेहवागने भारतीय संघावर टीका केलेले ट्विट आता चांगलेच व्हायरल व्हायला लागले आहे. सेहवागने यावेळी दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये सेहवाने म्हटले आहे की, " भारताने फक्त १९ धावांमध्ये आपले सहा फलंदाज गमावले आहेत. आतापर्यंत भारतावर अशी वेळ कधीही आली नव्हती. कारण आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासामध्ये भारतीय संघाने ६ विकेट्स १९ धावांमध्ये कधीच गमावले नव्हते. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घातल्याचेच पाहायला मिळाले. पण थोडी आशा अजूनही ठेवलायला हवी. काय माहिती काही तरी जादू होऊन जाईल." सेहवागने जेव्हा पहिले ट्विट केले तेव्हा भारतीय संघ ऑल आऊट झालेला नव्हता. पण ऑल आऊट झाल्यावरही सेहवागने एक ट्विट केले आहे. सेहवागने यावेळी भारतीय संघातील खेळाडूंनी ज्या धावा केल्या, त्या सलग लिहिल्या आहेत आणि मोबाईलमध्ये एखादा ओटीपीचा क्रमांक यावा, असे त्याने म्हटले आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. याआधी १९२४ साली दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा ३० धावांवर ऑल आउट झाला होता. तेव्हा आफ्रिकेच्या संघातील सर्वाधिक धावसंख्या ७ इतकी होती. त्या सामन्यात ३० धावांमध्ये ११ धावा या अतिरिक्त धावा होत्या. १९२४ नंतर २०२० साली भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी नकोशी कामगिरी केली. भारताला फक्त ३६ धावा करता आल्या आणि मयांक अग्रवालने सर्वाधिक ९ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वात कमी धावसंख्येचा विचार केल्यास १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९७४ साली भारताचा डाव ५८ धावांवर संपुष्ठात आला होता. आज विराट आणि कंपनीने हा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सातव्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3h1QFop
No comments:
Post a Comment