मुंबई: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आल्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा संघाची निवड झाली होती तेव्हा बराच वाद झाला होता. तेव्हा ज्या खेळाडूंना संधी मिळणे अपेक्षित होते पण मिळाली नाही अशांना यावेळी इंग्लंड दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. वाचा- भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्राने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघातील दोन खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईचे ( ) आणि () यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. आयपीएल २०२० मध्ये या दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली होती. सूर्यकुमारला ऑस्टेलिया दौऱ्यात संधी मिळाली नाही. यावरून बराच वाद झाला होता. वाचा- आकाश चोप्राच्या मते, इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत या दोन्ही खेळाडूंना संधी मिळू शकते. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी मिळू शकते. कारण श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांचे संघातील स्थान नक्की नाही. वाचा- अय्यर आणि सॅसमन यांचे संघाती स्थान पक्के नाही. सॅमसनला संधी मिळाली पण त्याचा त्याने उपयोग केला नाही. अय्यरचे स्थान देखील ५०-५० इतकेच आहे. ऑस्ट्रेलियात अय्यरची कामगिरी चांगली झाली नाही. संघात मनीष पांडेचे स्थान देखील पक्के नाही. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी मिळू शकते. वाचा- अय्यर, सॅमसन आणि मनीष यांच्या अपयशामुळे सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. या दोघांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. जर २०२१ मध्ये देखील चांगली कामगिरी केली तर ते निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JNNGnF
No comments:
Post a Comment