पुणे: करोनाविरुद्धच्या लढ्यात अनेकांनी या जीवघेण्या व्हायरसवर मात केली. पण देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करोना सारख्या महाभयंकर आजारावर मात केलेल्या एका क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू झाला. वाचा- पुण्यातील जाधववाडी येथील मयूर चषक क्रिकेट स्पर्धेत ओझर आणि जांबुत या संघात सामना सुरू होता. या सामन्यात फलंदाजी करणारे महेश उर्फ बाबू नलावडे हे मुळचे जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचे. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या महेश यांनी अनेक मैदाने गाजवली. काल (१७ फेब्रुवारी) सामना सुरू असताना ओझर संघाकडून खेळणारे महेश नॉन स्ट्रायकरला उभे होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी खाली बसण्याचा प्रयत्न केला. पण ते कोसळले. महेश यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला. वाचा- या घटनेमुळे फक्त जुन्नर तालूकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. महेश यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी करोनावर मात केली होती. मुंबईत काम करणारे महेश गेल्या काही दिवसांपासून गावी घरातून वर्क फ्रॉम होम करत होते. गावात आल्याने आणि आवडता क्रिकेट खेळ खेळण्याची संधी मिळते म्हणून महेश मैदानावर उतरले. पण त्यानंतर जे काही झाले त्याचा कोणी विचार देखील केला नव्हता. महेश यांच्या निधनाने करोनावर मात केलेल्या रुग्णांनी पुढील काही महिने काळजी घ्यावी अशी चर्चा सुरू झाली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3asAoaC
No comments:
Post a Comment