मुंबई, : गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला लिलावापूर्वीच एक मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मुंबईच्या एका महत्वाच्या खेळाडूने मानसीक स्वास्थ बिघडल्यामुळे ट्वेन्टी-२० स्पर्धेतून ब्रेक घेतल्याचे पाहायाला मिळाले आहे. आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. पण त्याच्या एक दिवस अगोदरच मुंबईच्या संघाला एक धक्का बसला आहे. कारण संघातील महत्वाचा खेळाडू असलेल्या क्विंटन डीकॉकने यावेळी मानसीक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवले आहे. डीकॉकला यावेळी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता किती दिवस तो ब्रेक घेणार आहे हे स्पष्ट झालेले नाही. ब्रेक घतल्यामुळे डीकॉक स्थानिक ट्वेन्टी-२० सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डीकॉक आता आयपीएल खेळणार की नाही, हेदेखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. बायो-बबलमुळे डीकॉकने ब्रेक घेतल्याचे म्हटले आहे. यावर्षी भारतामध्ये आयपीएल खेळवण्यात येणार आहे आणि त्यामध्येही बायो-बबल वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा त्रास पुन्हा एकदा डीकॉकला होऊ शकतो. त्यामुळे डीकॉकच्या आयपीएल खेळण्याबाबत संदिग्धता आहे. डीकॉक हा काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक घेणार आहे, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्रिकइन्फो या वृत्तवाहिनीला दिली आहे. पण डीकॉक किती दिवस क्रिकेटपासून लांब राहणार आहे, हे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे डीकॉकच्या कारकिर्दी़बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीकॉककडे राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद होते. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघात डीकॉक हा महत्वाची भूमिका पार पाडत होता. त्यामुळेच डीकॉकला मुंबईच्या संघाने कधीही वगळले नव्हते. डीकॉक संघाला रोहित शर्माबरोबर चांगली सुरुवात करुन द्यायचा, त्याचबरोबर तो उत्तम यष्टीरक्षणही करायचा. या दोन्ही गोष्टींचा चांगला समतोल डीकॉकमध्ये पाहायला मिळाला होता. त्यामुळेच त्याला मुंबईच्या संघाने कधीही डच्चू दिला नव्हता. पण आता डीकॉकचे मानसीक स्वास्थ बिघडले आहे. तो जर आयपीएल खेळणार नसेल तर त्याच्या जागी कोणाला खेळवायचे, याचा विचारही आता मुंबईच्या संघाला करावा लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qzNDvS
No comments:
Post a Comment