चेन्नई: भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव झाला. चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. पण एका खेळाडूने सर्वाचे लक्ष वेधले तो म्हणजे () होय. अलीने सामन्यात आठ विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात १८ चेंडूत ४३ धावा केल्या. आता इतकी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची खुद्द कर्णधाराने माफी मागितली आहे. वाचा- मंगळवारी भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट( )ने याने मोइन अली संदर्भात एक विधान केले होते. तो म्हणाला होता की, दुसऱ्या कसोटीनंतर अलीने मायदेशात परत जाण्याचा पर्याय निवडला आहे. आम्ही आधीच स्पष्ट केले होते की, जर खेळाडूला वाटत असेल की त्याला जैव सुरक्षेच्या वातावरणातून बाहेर जायचे आहे तर तो तसा पर्याय निवडू शकतो. प्रत्यक्षात मोइन अलीने राष्ट्रीय संघाच्या रोटेशन नियमानुसार हा निर्णय घेतला आहे. मोइन अलीने १० दिवसाच्या विश्रांतीसाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी ही मोइन अलीची अॅशेस २०१९ नंतरची पहिली मॅच होती. वाचा- रुटने केलेल्या विधानावर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्याने मोइन अलीची माफी मागितली. ब्रिटनमधील काही वृत्तपत्रांनी रूटच्या माफीचे वृत्त दिले आहे. वाचा- मोइन अली प्रमाणेच जोस बटलर देखील पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परत गेला होता. आता तो टी-२० आणि वनडे मालिकेसाठी भारतात परत येणार आहे. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांना देखील श्रीलंका दौऱ्यात विश्रांती दिली होती. वाचा- जॉनी बेयरस्टोला भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत संघात घेतले नाही म्हणून माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. लंकेविरुद्धच्या दौऱ्यात त्याला विश्रांती दिली होती. बेयरस्टो भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीसाठी भारतात येणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dmQ5ls
No comments:
Post a Comment